सातवीच्या विद्यार्थिनीला 5 जणांनी कारमध्ये बसवलं अन् जंगलात..

Crime News : सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नारळपाणी आणण्यास बाहेर गेलेल्या पीडित विद्यार्थिनीला चार ते पाच मुलांनी जबरदस्ती करत जंगलात नेले. संबंधित घटनेची माहिती मिळताच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Crime News

Crime News

मुंबई तक

19 Jun 2026 (अपडेटेड: 19 Jun 2026, 08:46 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पीडितेला चारचाकी गाडीत बसवून जंगलात नेले अन्... 

point

सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

Crime News : भोजपूर सहार पोलीस ठाणे परिसरात इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नारळपाणी आणण्यास बाहेर गेलेल्या पीडित विद्यार्थिनीला चार ते पाच मुलांनी जबरदस्ती करत जंगलात नेले. संबंधित घटनेची माहिती मिळताच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पीडित विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, पोलीस आरोपीची ओळख पटवत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सावत्र बापाने 'त्या' हेतूने 24 वर्षीय विवाहित लेकीला खोलीत नेत...

पीडितेला चारचाकी गाडीत बसवून जंगलात नेले अन्... 

रविवारी दुपारी, विद्यार्थीनी तिच्या गावातून सहार बस स्टँडवर नारळपाणी आणण्यास गेली होती. घरी परतण्यासाठी ती एका टेम्पोची वाट पाहू लागली होती. तेव्हा तिच्याच गावातील एका तरुणासह चार मुलं तिथे आली आणि तिला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवले आणि जंगलात नेलं,  नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

प्रसारमाध्यमानुसार, पीडितेनं आरोपींना ओळखले आहे. घृणास्पद कृत्याने पीडित मुलगी कशीबशी घरी पोहोचली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला, त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. या प्रकरणी आरोपींवर कारवाई सुरू आहे.

हे ही वाचा : सुपरवायझरनं महिलेला चुकीचा स्पर्श केला, रात्री व्हिडिओ कॉल..

पीडितेच्या विनयभंगाचा निषेध करणाऱ्या काकांवर शस्त्राने हल्ला

बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील गुन्हेगारांनी मोठं कांड केलं. औराई पोलीस ठाणे परिसरातील एका गावात पीडितेच्या विनयभंगाचा निषेध करणाऱ्या काकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. मुलीच्या काकांना गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.