Crime News : सहा वर्षीय अंगदवीरच्या अपहरण आणि हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अर्पित पाराशर याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर त्याच्या कबुलीजबाबातून अंगदवीरचा मृतदेह भद्रकाली जंगलातील झुडपांतून सापडला. आरोपीने गळा चिरून निष्पाप बालकाची हत्या केल्याची कबुली दिली असून, या प्रकरणात मुलाची आई गुरप्रीत कौर हिचाही सहभाग असल्याचा संशय असल्याने तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने माणुसकीला काळीमा फासली असून गावकरी आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सोलापूर : जेलमधून थेट मतदानासाठी, न्यायालयाचीही परवानगी, शालन शिंदे आहेत तरी कोण?
आईला आणि अर्पितला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले अन्...
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अर्पित पाराशर हा हापूरमधील एका बँकेत एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत होता आणि अंगदवीरची आई गुरप्रीत कौर एका खासगी शाळेत शिक्षिका होती. प्रवासादरम्यान त्यांची ओळख झाली आणि कालांतराने त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दोन दिवसांपूर्वी अंगदवीरने आपल्या आईला आणि अर्पितला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. स्वतःची बदनामी होईल या भीतीपोटी अर्पितने अंगदवीरला वाटेतून हटवण्याचा क्रूर कट रचला. मंगळवारी अर्पितने अंगदवीरला कारमध्ये बसवून फसवून नेले आणि भद्रकाली जंगलातील सती माता मंदिराच्या जवळ नेऊन त्याची गळा चिरून हत्या केली.
हेही वाचा : खासदारानंतर आता ठाकरेंचे आमदार फुटणारच, भाजप आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखा बोलला
अंगदवीर बेपत्ता झाल्यानंतर आरोपी अर्पितने पोलिसांना पूर्णपणे गोंधळात टाकले होते. त्याने अंगदवीरला पुठ्ठी गंगनहरमध्ये फेकून दिल्याची खोटी माहिती दिल्याने एनडीआरएफच्या टीमने तब्बल नऊ तास नहर शोधली, पण काहीही हाती लागले नाही. अखेर पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवला आणि कडक चौकशी केली, तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने मृतदेह जंगलात फेकून दिल्याची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, हे अमानवी कृत्य केल्यानंतरही आरोपी अर्पितच्या चेहऱ्यावर कसलीही खंत नव्हती; तो आपल्या पत्नीसह फलावदा येथील एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता, जिथून पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.
पोलीस अधिकारी पंकज लवानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि आरोपीची वॅगनआर कार जप्त करण्यात आली आहे. फॉरेंसिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. अंगदवीरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आपल्याच आईच्या प्रियकराने मुलाचा जीव घेतल्यामुळे परिसरात मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच दोषारोपपत्र दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या घटनेने अनैतिक संबंधांचे भीषण आणि क्रूर रूप पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे. उत्तर प्रदेशातील बहसूमा येथे ही घटना घडली.
ADVERTISEMENT











