Panjab Crime News : पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील जंडवाला मीरा सांगला गावात एक धक्कादायक हत्येची घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झालेल्या पत्नीला पुन्हा एकत्र राहण्याचे आश्वासन देत भेटीसाठी बोलावून तिची हत्या केल्याचा आरोप माजी पतीवर आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मोदींचं कौतुक करणारे विवेक ओबेरॉय अन् आर माधवन राहायला दुबईत, राज ठाकरेंनी सगळंच काढलं
मृतदेह खड्ड्यात पुरला अन् पुरावे नष्ट; पण गावकऱ्यांमुळे ट्वीस्ट
मृत महिलेची ओळख 42 वर्षीय सरोज अशी झाली आहे. घटस्फोटानंतर ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, गुरमीत सिंग याने सरोजला पुन्हा नातेसंबंध प्रस्थापित करून एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि भेटण्यासाठी बोलावले. भेटीनंतर त्याने तिला झुडपांजवळील एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे धारदार शस्त्राने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरून गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा : 'तुम्ही कधीही चुकणार नाही, ही माझी गॅरंटी...' अमित शहांचा देशातील तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?
हत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलं रील
या हत्येपूर्वी सरोजच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला एक व्हिडीओ रीलही समोर आला आहे. या रीलमध्ये सरोज आणि गुरमीत एकत्र दिसत असून, पार्श्वभूमीवर 'Yaad teri ban gayi sajna ve sade seene ch nasoor' हे गाणे वाजत आहे. व्हिडीओमध्ये गुरमीत विजयाचे चिन्ह दाखवतानाही दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. हा रील समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाकडे अधिक लक्ष वेधले गेले आहे.
दरम्यान, घटनास्थळाजवळ शेळ्या चारत असलेल्या एका मेंढपाळाला महिलेच्या आरडाओरडाचा आवाज ऐकू आला. तो तातडीने त्या दिशेने धावत गेला. कोणीतरी येत असल्याची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर मेंढपाळाने गावकऱ्यांना माहिती दिली आणि गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी फाजिल्का सिव्हिल रुग्णालयात पाठवला. त्यानंतर गुरमीत सिंग याला गावातून अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT












