Crime News : देशातील महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. एका व्यक्तीने घरात कोणीही नसल्याचे पाहून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडित मुलीचे वय 12 वर्षे होते. या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडितेचे कुटुंब चिंतेत पडले. कुटुंबियांनी धाडस दाखवत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीचा शोध घेणं सुरू ठेवला. ही घटना राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यातील आहे. या लज्जास्पद घटनेनं परिसर हादरून गेला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बिहारमध्ये प्रशांत किशोर यांचा मोठा विजय, भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग
रस्त्याने मुलीचा पाठलाग करत छळ
घडलेल्या घटनेनुसार, पीडितेच्या आईच्या तब्येतीत बिघाड झाला होता. पीडितेच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा पीडितेचे वडील आणि बहीण आपल्या आईसाठी जेवण घेऊन रुग्णालयात गेले होते. यादरम्यान, घरात दोन अल्पवयीन मुली एकट्याच होत्या. जेव्हा 12 वर्षीय थोरली मुलगी एका दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती, तेव्हा आरोपी तरुणाने रस्त्याने तिचा पाठलाग केला होता. नंतर तिचा छळ करण्यास सुरूवात केली होती.
पीडितेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी
पीडितेचा पाठलाग केल्यानंतर आरोपी एवढ्यावरच न थांबता, तो पीडितेच्या घरात शिरला आणि आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान, दोन्ही अल्पवयीन मुलींना विरोध केला. नंतर आरोपीने या घटनेची कोणाला माहिती सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील दिली.
हे ही वाचा : पिक्चरमध्ये काम देण्याचा बहाणा, हॉटेलवर बोलावून गुंगीचं औषध मिसळत अत्याचार
या घटनेची माहिती मिळताच, पीडितेच्या वडिलांनी तात्काळपणे स्थानिक पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत, आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांचे काही पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












