रिक्षा चालकाने 18 वर्षीय पॅसेंजरला निर्जनस्थळी नेलं, बंद दुकानात सामुहिक बलात्कार

सुमित भुजबळ

• 08:11 AM • 13 Nov 2026

Crime News : बिहारच्या सासाराममध्ये 18 वर्षीय तरुणीवर ऑटोचालक आणि त्याच्या साथीदाराने सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रिक्षा चालकाने 18 वर्षीय पॅसेंजरला निर्जनस्थळी नेलं

point

बंद दुकानात सामुहिक बलात्कार

Crime News : बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासाराम येथे 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ऑटोचालक आणि त्याच्या साथीदाराने तरुणीचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

एका बंद पडलेल्या दुकानात तिच्यावर सामूहिक बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ताराचंडी परिसरातून बेडा येथे जाण्यासाठी ऑटो रिक्षामध्ये बसली होती. मात्र, ऑटोचालकाने तिला नियोजित ठिकाणी नेण्याऐवजी निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर ऑटोचालक आणि त्याच्या साथीदाराने एका बंद पडलेल्या दुकानात तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. प्रवासासाठी ऑटोमध्ये बसलेल्या तरुणीसोबत हा प्रकार घडल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : "राजेश खन्ना स्टाइलचे कपडे अन् अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू; दादांशिवाय दिवाळी सुनी-सुनी"

दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात

या घटनेनंतर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संदीप कुमार आणि चित्ररंजन पासवान या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेनंतर पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी सासाराम सदर रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.

दरम्यान, बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातही अशाच प्रकारची एक घटना समोर आली होती. 11 जूनच्या रात्री पाच जणांनी एका महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी महिलेचे हात-पाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. तसेच धारदार वस्तूने तिला जखमी केल्याचेही महिलेने सांगितले होते. सुरुवातीला महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 12 जून रोजी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र, त्यानंतरही तीव्र वेदना होत असल्याने 17 जून रोजी तिला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांना तिच्या शरीरातून काडतुसासारखी वस्तू, दगड आणि लाकडाचा तुकडा आढळल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावरून तपास सुरू असून बेगुसराय सदरचे डीएसपी आनंद कुमार पांडे यांनी वैज्ञानिक पद्धतीने सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचे सांगितले.