आईचे ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध, 24 वर्षीय मुलाला कुणकुण लागताच रचला भयानक कट

पृथ्वीराज पाटील

• 04:11 PM • 12 Nov 2026

बेंगलोरमधील एका आईने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे. त्याने अनैतिक संबंधाला विरोध केल्याने थरारक कट रचून त्याची हत्या करण्यात आली.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आईच्या अनैतिक संबंधांना विरोध

point

पोटच्या मुलाची हत्या

point

आरोपी कसे सापडले?

Crime News : बंगळुरू येथे राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या आईच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध केल्यामुळे त्याच्याच आईने, तिच्या प्रियकराने आणि त्याच्या चार मित्रांनी मिळून त्या तरुणाची निर्घृण हत्या केली. विजय नारायण (वय 24) असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याची आई मीना नारायण या एका ब्युटी पार्लरमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होत्या आणि त्यांचे महाराष्ट्रातील राजेश जमुनी नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. राजेशला मीना यांनी ड्रायव्हर म्हणून ठेवले होते.

हे वाचलं का?

कसा रचला कट?

आईच्या या अनैतिक संबंधांची कुणकुण मृत तरुणाला लागताच त्याने या गोष्टीचा कडाडून विरोध केला, परंतु हे जोडपे आपले अनैतिक संबंध लपूनछपून सुरूच ठेवून या प्रकरणात अडथळा ठरत असलेल्या तरुणाला आपल्या मार्गातून पूर्णपणे हटवण्याचा कट रचला. मिळालेल्या माहितीनुसार, त्या तरुणाला कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात आणण्यात आले आणि या खुनाच्या कृत्यासाठी आई मीना व प्रियकर राजेश यांनी मिळून राजेशच्या सचिन, मनोज, तमन्ना आणि एकनाथ नावाच्या चार मित्रांची मदत घेतली.

हे ही वाचा : 13 शिक्षकांची आत्महत्या, 400 कोटींची थकबाकी; पुण्यातील प्रसिद्ध शिक्षणसंस्थेला उच्च न्यायालयाचा दणका

निर्जनस्थळी सापडला मृतदेह

1 नोव्हेंबर रोजी  त्या तरुणाचा गळा आवळून त्याची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह महामार्गावरील एका निर्जन भागात फेकून दिला. घटनेच्या दिवशी मृताचा मृतदेह हायवेच्या कडेला आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि मृत तरुणाच्या मोबाईल फोनची कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासली, ज्यामुळे या संपूर्ण भयानक कटाचा आणि खुनाच्या या गुन्ह्यात चक्क त्याच्या स्वतःच्या आईचाच सहभाग असल्याचा पर्दाफाश झाला.

हे ही वाचा : स्वतःला कुरूप समजायची 19 वर्षीय विद्यार्थिनी, शेवटी घडलं भयंकर; गंभीर मानसिक आजाराची थरारक कहाणी!

सहा जणांना अटक

पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत सूत्रधार आई मीना, प्रियकर राजेश आणि त्याचे अन्य चार साथीदार सचिन, मनोज, तमाण्णा व एकनाथ अशा सर्वच्या सर्व सहा आरोपींना बेड्या ठोकून अटक केली आहे. मुलाने आईच्या चुकीच्या कृत्याला विरोध केल्यामुळे  पोटच्या गोळ्याचा काटा काढल्याच्या या थरारक घटनेमुळे कर्नाटकसह संपूर्ण परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.