Crime News : उत्तर प्रदेशातील कनौज येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या मनात पत्नीप्रति संशयाची पाल चुकचुकल्याने पतीने आपल्या पत्नीला खुर्चीला बांधले आणि तिला जाळलं. पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळावर काही लोक वाचवण्यासाठी आले मात्र तोवर उशिर झाला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नवी मुंबई हादरली! प्रेमप्रकरणातून सख्ख्या बहिणींवर गोळीबार, एकजण गंभीर जखमी
आग विझवण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न
हा धक्कादायक प्रकार उथ्तर प्रदेशातील कोन्नौज येथील छिब्रमऊ पोलीस ठाणे परिसरात गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सिकंदरपूर चौकीअंतर्गत जगतपूर गावात घडली होती. ग्रामस्थांनी स्वत:हून आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी घटनेची माहिती दिली.
महिलेचा दुर्दैवी मृत्यू
या घटनेची माहिती मिळताच, सिकंदरपूर चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाने काही अवधीतच आगीवर नियंत्रण मिळवले होते. या घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. पोलिसांनी प्रकरणात आरोपीला अटक केली.
हे ही वाचा : मुंबई : लिफ्टजवळ थांबलेला वृद्ध महिलेला पत्ता विचारला अन्...थरकाप उडवणारा व्हिडीओ
अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय
संबंधित प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, आऱोपी पती सुखवीर सिंगला आपल्या पत्नीचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्या दोघांचे प्रेमविवाह झाले होते. सुखवीर सिंग हिसारमध्ये काम करत होता आणि तेथून परतल्यानंतर त्याने हा गुन्हा केला. पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की,स पत्नीच्या हत्येप्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












