Kurla Firing News, लतीफ शेख : मुंबईतील कुर्ला भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पश्चिम भागात आज (11 नोव्हेंबर) दुपारी जुन्या वैमनस्यातून एका व्यक्तीवर उघडपणे गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 12:40 वाजण्याच्या सुमारास मकडवाला कपाऊंड परिसरात हा प्रकार घडला. 40 वर्षीय विनोद मल्लिप्पा पवार असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून जुन्या वादातून त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
हे ही वाचा : 'तुमच्याकडे पैसे असतील की? रस्ते नीट करा..',चिमुकल्याचा फोन, ओमराजेंचं मिश्किल उत्तर
प्रकृती चिंताजनक
गोळी लागल्याने रक्तबंबाळ झालेल्या विनोद पवार यांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हे ही वाचा : नर्सची करवतीने वार करुन हत्या, नवऱ्याच्या क्रूरतेचा कळस, दोन वर्षांपासून मृतदेह गायब
आरोपींचा शोध सुरु
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन व्ही. बी. नगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. अप्पर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT












