Crime News : अमेरिकेत राहणाऱ्या एका नेपाळी-अमेरिकन व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याच्या धक्कादायक प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नरेश भट (वय 39) नावाच्या या आरोपीला त्याच्या पत्नीच्या, ममता भट हिच्या प्रथम श्रेणी हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. पत्नीने आत्महत्या केली होती आणि घाबरून आपण तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, असा दावा नरेशने न्यायालयात केला होता; मात्र ज्युरींनी त्याचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.
ADVERTISEMENT
मृतदेह अद्याप गायब
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी नरेश भटने स्वतः न्यायालयात कबुली दिली होती की, त्याने करवतीच्या साह्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यांची विल्हेवाट लावली. जुलै 2024 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर ममताचा मृतदेह आजपर्यंत पोलिसांना मिळालेला नाही. हत्या करण्यासोबतच मृतदेहाची विल्हेवाट लावणे आणि त्याची विटंबना करणे या दोन अतिरिक्त आरोपांखालीही त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या प्रकरणाचा या निर्णयामुळे अखेर निकाल लागला आहे.
हे ही वाचा : 'तुमच्याकडे पैसे असतील की? रस्ते नीट करा..',चिमुकल्याचा फोन, ओमराजेंचं मिश्किल उत्तर
जन्मठेप होणार का?
न्यायालयाने आरोपीचा जामीन रद्द केला असून त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. या गुन्ह्यासाठी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा तसेच मृतदेहाची विटंबना केल्याच्या इतर आरोपांसाठी अतिरिक्त वर्षांची शिक्षा होऊ शकते. महिन्याभराहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीत ममताची आई, भाऊ आणि मैत्रिणीने दिलेल्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाचा निकाल वाचून दाखवला जात असताना आरोपीच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, तर दुसरीकडे पीडितेच्या कुटुंबाने सुटकेचा विश्वास व्यक्त करत सरकारी वकिलांचे आभार मानले.
हे ही वाचा : चिमुकल्याची हत्या करुन किडनी अन् डोळे काढले, अवयव विकून व्हायचं होतं श्रीमंत, कोण आहे आरोपी?
नर्स म्हणून कार्यरत
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ममता या भारतीय वंशाच्या असून त्या व्हर्जिनियातील एका वैद्यकीय केंद्रात परिचारिका (नर्स) म्हणून कार्यरत होत्या. आरोपीने सुरुवातीला पोलिसांना व माध्यमांना सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता की, पत्नी अचानक बेपत्ता झाली आहे. मात्र लहान मुलीचा पहिला वाढदिवस काही दिवसांवर आला असताना ममता अचानक गायब झाल्याने कुटुंबाला संशय आला. व्यापक तपासानंतर पोलिसांनी नरेशला अटक केली आणि अखेर न्यायालयात त्याच्यावरील हत्येचा गुन्हा सिद्ध झाला.
ADVERTISEMENT












