'तुमच्याकडे पैसे असतील की? रस्ते नीट करा..',चिमुकल्याचा फोन, ओमराजेंचं मिश्किल उत्तर

Omraje Nimbalkar : धाराशिवमधील चिमुकल्याचा खासदार ओमराजे निंबाळकरांना फोन, रस्ते नीट करण्याची मागणी..ओमराजेंचं मिश्किल उत्तर

ADVERTISEMENT

 Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'तुमच्याकडे पैसे असतील की? रस्ते नीट करा..',

point

चिमुकल्याचा फोन, ओमराजेंचं मिश्किल उत्तर

Dharashiv Politics, गणेश जाधव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. नागरिकांचे फोन उचलून त्यांच्या समस्या ऐकून घेण्याच्या त्यांच्या स्वभावाची नेहमीच चर्चा होत असते. आता एका चिमुकल्यासोबत झालेल्या त्यांच्या मिश्किल संवादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील सौदाना गावातील सुमित पालकर या चिमुकल्याने थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन केला. ‘आमच्या गावातील रस्ते खराब झाले आहेत. हे रस्ते चांगले कधी करणार? माझ्या मामाची गाडी रस्त्यावर घासली ना,’ असा थेट प्रश्न त्याने खासदारांना विचारला.

हेही वाचा : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पहिली नॉन एसी ऑटोमॅटिक डोअर लोकल ट्रेन दाखल, काय बदल होणार?

यावर ओमराजेंनी दुष्काळाचे कारण सांगत दुष्काळासाठी निधी वर्ग केल्याचे स्पष्ट केले. मात्र, सुमितनेही लगेच ‘तुमच्याकडे पैसे नसतात का?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यावर ‘पैसे हे शासनाचे असतात,’ असे ओमराजेंनी त्याला समजावून सांगितले.

यानंतर मात्र ओमराजेंनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत चिमुकल्याला प्रतिप्रश्न केला. ‘तुझ्या मामाला मुलगी आहे का? तू मामाची खूप काळजी करतोस,’ असे म्हणत त्यांनी लांबची तयारी करून ठेवण्याच्या अंदाजात मिश्किल टोला लगावला. त्यांच्या या अनपेक्षित प्रश्नामुळे फोनवरील संवादाला आणखी रंगत आली.

सहज उपलब्ध खासदारांच्या संवादाची सोशल मीडियावर चर्चा

राजकीय नेत्यांशी सर्वसामान्य नागरिकांना थेट संपर्क साधणे अनेकदा अवघड असते. मात्र, ओमराजे निंबाळकर नागरिकांचे फोन स्वीकारून त्यांच्या अडचणी ऐकून घेतात, अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या याच सहज उपलब्धतेची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

एका चिमुकल्याने थेट खासदारांना फोन करून गावातील खराब रस्त्यांचा प्रश्न मांडला आणि खासदारांनीही त्याला आपुलकीने मिश्किल उत्तर दिले. रस्त्यांच्या प्रश्नापासून सुरू झालेला हा संवाद ‘मामाला मुलगी आहे का?’ या खासदारांच्या सवालामुळे आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.