बीड : मुलीच्या अंगावर पडली फटाक्याची ठिणगी, पाच जणांवर धारदार शस्त्राने वार

बीडच्या गेवराईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फटाके उडवण्यावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली.

ADVERTISEMENT

Beed Crime
Beed Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

फटाक्याच्या ठिणगीवरुन वाद

point

बीडमध्ये घडलं भयंकर

Beed Crime : बीडच्या गेवराईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील पवार गल्ली परिसरात फटाके फोडण्यावरून उद्भवलेल्या किरकोळ वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत जमावाने धारदार शस्त्रांनी हल्ला केल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.

फटाक्याच्या ठिणगीवरुन वाद

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील खडके हे आपल्या पत्नी व मुलीसह रिक्षाने घरच्या दिशेने जात होते. पवार गल्ली परिसरातील मशिदीजवळ काही तरुण फटाके फोडत असताना फटाक्याची ठिणगी खडके यांच्या मुलीच्या अंगावर पडली. यावरून दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले आणि हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी अंगावर, मानेवर व पाठीवर सपासप वार केले. या दरम्यान एका महिलेलाही मारहाण करण्यात आली.

हे ही वाचा : '... अश्रू तरळले!', पवारांविषयी सोनिया गांधींनी पुस्तकात काय लिहिलंय?

मानेवर, छातीवर धारदार शस्त्राने वार

या शस्त्राने केलेल्या हल्ल्यात सार्थक सुनील खडके (वय 21), मनीषा सुनील खडके (वय 42), ओम गणेश खडके (वय 19), सुनील सुधाकर खडके (वय 50) आणि मंगेश शिवाजी गोरे (वय 19) हे सर्वजण रक्तबंबाळ झाले. स्थानिकांनी तत्काळ पुढाकार घेऊन सर्व जखमींना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी मंगेश गोरे यांच्या मानेवर आणि छातीवर गंभीर वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असून, त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

हे ही वाचा : 5 मिनिटांत बंटी पाटलांकडून सारे हिशोब चुकते! चंद्रकांत पाटलांना थेट चॅलेंज

पोलिसांनी काय सांगितले?

घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धराज सुकाळे आणि जमादार सोनवणे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तात्काळ  जखमींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. याप्रकरणी सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.