Crime News : दिवाळीच्या बोनसच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका कर्मचाऱ्याची हत्या केल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. कंपनीत काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांनीच साथीदाराची निर्घृण हत्या केल्यानंतर मृतदेह कारमध्ये लपवून पोबारा केला, मात्र वाटेत अपघात झाल्यामुळे हा भयंकर गुन्हा उघडकीस आला. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
बोनसवरुन वाद अन् हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन हर्ब्स कंपनीत गेल्या काही वर्षांपासून काम करणाऱ्या सोम यांच्याशी आरोपी सोनूने दिवाळीच्या बोनसच्या रकमेवरून फोनवर वाद घातला. बोनसचे पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या सोनूने त्यांना कंपनीत बोलावून घेतले, जिथे सोनू,नितीन, अमन, अक्षय व कल्लू या आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घालून बेदम मारहाण केली आणि जातीसूचक शब्दांचा वापर केला.
हे ही वाचा : चिमुकल्याची हत्या करुन किडनी अन् डोळे काढले, अवयव विकून व्हायचं होतं श्रीमंत, कोण आहे आरोपी?
कसे सापडले आरोपी?
या अमानुष मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने आणि अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे सोम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर ठेवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोबारा केला, परंतु कंपनीपासून अवघ्या काही अंतरावर त्यांची कार वेगात असताना एक भीषण अपघात झाला.
हे ही वाचा : बीड : मुलीच्या अंगावर पडली फटाक्याची ठिणगी, पाच जणांवर धारदार शस्त्राने वार
हत्येचे बिंग फुटले
अपघातानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि कारमधून मृत सोम यांचा मृतदेह ताब्यात घेतला. सुरुवातीला हा निव्वळ रस्ता अपघात असल्याचे भासले होते, परंतु मृतकाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून हत्येचे बिंग फुटले असून, कुतुबशेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












