Crime news : प्रेयसीचा दुसऱ्या ठिकाणी विवाह जुळल्याने प्रियकराने आपल्या प्रेयसीचा गळा दाबून तिची हत्या केली. याच प्रकरणाला घेऊन दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि आरोपीने तरुणीला संपवलं. हत्येनंतर मृतदेह बिजली बंबा बायपासच्या जंगलात फेकून दिला होता. घटनेनंतर आरोपीने स्वतःच पोलीस हेल्पलाइन क्रमांक 112 वर फोन करून खुनाची माहिती दिली आणि आत्मसमर्पण केले. हा प्रकार मेरठ येथील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : TCS प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप, इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख समरीन म्हणून पटली. ती मेरठमधील शौकत वसाहतीतील रहिवासी होती आणि लिसाडी गेट पोलीस ठाण्यात हद्दीत राहत होती. समरीन फतेहउल्लपूर परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. गुरूवारी सकाळी, तिचा धाकटा भाऊ तिला नेहमीप्रमाणे कामावर सोडायला आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, समरीनचा प्रियकर, फिरोजने तिला भेटण्यास बोलावले होते, त्यानंतर ती भेटायला गेली होती.
फिरोज आणि समरीन यांचे प्रेमसंबंध
शहर पोलीस अधीक्षक विनायक गोपाळ भोसले यांच्या म्हणण्यांनुसार, फिरोज आणि समरीन यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही काळापासून त्यांच्यात सतत वाद सुरू होता. फिरोजने सांगितलं की, त्याला समरीनशी विवाह करायचे होते आणि तिच्यावर दबाव टकत होता. त्यानंतर त्याला कळलं की, समरीनचे लग्न दुसरीकडे ठरवले जात आहे. यामुळे तो संतापला आणि दोघांमधील तणाव वाढला.
लग्नावरून वाद, फिरोजने गळा दाबून सिमरनला संपवलं
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, गुरुवारी दोघांमध्ये झालेल्या भेटीदरम्यान त्याच मुद्द्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर फिरोजने समरीनचा गळा दाबवा, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने तिचा मृतदेह बिजली बाम्बा बायपासजवळील जंगलात फेकून दिला. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली.
हे ही वाचा : मालकाने मुलीसोबत नोकराला खोलीत पाहिलं अन्.. भयंकर घडलं
हत्येनंतर, फिरोजने 112 या पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून स्वत: घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याने समरीनची हत्या केली असून तिचा मृतदेह जंगलात पडलेला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रतापपूरजवळ आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी समरीनचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.
ADVERTISEMENT












