कारागृहात कैद्यांची क्रूरता, 20 वर्षीय तरुणावर साडी नेसवून अनैसर्गिक अत्याचार, 19 जणांविरोधात गुन्हा

पृथ्वीराज पाटील

• 10:52 AM • 13 Nov 2026

रांचीमधील कारागृहात कैद असलेल्या एका 20 वर्षीय तरुणाला महिलांचे कपडे घालून त्याचा मेकअप करण्यात आला. त्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याला जबरदस्तीने अंमली पदार्थही देण्यात आले.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कारागृहात कैद्यावर अत्याचार

point

19 जणांविरोधात एफआयआर दाखल

Crime News : रांचीच्या बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये एका 20 वर्षीय विचाराधीन कैद्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 12 जून 2026 रोजी न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केल्यानंतर जेव्हा हा तरुण तुरुंगातून बाहेर आला, तेव्हा त्याच्या वागण्यात मोठा बदल व मानसिक तणाव दिसून आला. कुटुंबीयांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता, त्याने तुरुंगात आपल्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराची धक्कादायक माहिती दिली.

हे वाचलं का?

साडी नेसवली, मेकअप केला अन्...

पीडित तरुणाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये कैद्यांच्या एका गटाने तरुणाला जबरदस्तीने नशा आणणारे पदार्थ दिले. त्यानंतर त्याला बळजबरीने साडी नेसवून व मुलीचा मेकअप करून तीन वेळा अनैसर्गिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याला देण्यात आली, ज्यामुळे तरुण पूर्णपणे मानसिक धक्क्यात गेला होता.

हे ही वाचा : 'मी हात जोडून विनंती करतो, आता हा विषय संपवा...' मुश्रीफ नमले

19 जणांविरोधात एफआयआर

या घृणास्पद प्रकाराबाबत तरुणाने तुरुंग प्रशासनाकडे लिखित स्वरूपात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, अधिकाऱ्यांनी त्याची तक्रार जाणीवपूर्वक फाडून टाकली आणि त्याला कोणतीही वैद्यकीय मदत किंवा उपचार मिळू दिले नाहीत, असा अत्यंत गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून 12 नोव्हेंबर रोजी तुरुंग अधीक्षकांसह विविध कर्मचारी व कैदी अशा एकूण 19 जणांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : दुष्काळाचं संकट 2027 मध्ये कायम राहणार? तज्ज्ञांनी काय सांगितलं?

प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

तुरुंगासारख्या सुरक्षित आणि सरकारी नियंत्रणाखालील ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही माहिती वेळेत बाहेर का आली नाही, तक्रार दाबणारे अधिकारी कोण होते आणि या अमानुष कृत्यात नेमके कोणा-कोणाचा सहभाग होता, या सर्व बाजूंचा पोलिस आता कसून शोध घेत आहेत व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.