मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. माणक चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुनार बावडी परिसरात एका तरुणाने आपल्या पत्नीची धारदार चाकूने गळा चिरून हत्या केल्याचं समोर आलंय. या घटनेनंतरही आरोपी तेथून पळून गेला नाही. उलट रक्ताने माखलेला चाकू हातात घेऊन तो पत्नीच्या मृतदेहाजवळच बसून राहिला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'माझे वहिनीसोबत अनैतिक संबंध...' चुलत भावांमध्ये दोन वर्ष वाद, शेवटी काय घडलं?
आरोपीचा आक्रमक पवित्रा पाहून शेजारी घाबरले...
घटनेच्या वेळी घरात केवळ पती असगर अली, त्याची पत्नी रूकैय्या आणि त्यांची मुले उपस्थित होती. आरोपीचे आई-वडील काही कामानिमित्त शहराबाहेर गेले होते. त्याच दरम्यान घरातून महिलेच्या जोरात किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्याने शेजारी घटनास्थळी धावले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाहिले की, पलंगावर महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या हातात चाकू होता आणि तो पत्नीवर वार करत होता. आरोपीचा आक्रमक पवित्रा पाहून शेजारी घाबरले आणि त्यांनी तातडीने घराबाहेर येत पोलिसांना घटनेची माहिती दिली.
हेही वाचा : मुलीने ITBP जवानासोबत प्रेमविवाह केला, बापाने सूड उगवला, काय घडलं?
रक्ताने माखलेला चाकू हातात घेऊन मृतदेहाजवळच बसून राहिला
पत्नीची हत्या केल्यानंतरही आरोपी घटनास्थळावरून फरार झाला नाही. तो रक्ताने माखलेला चाकू हातात घेऊन मृतदेहाजवळच बसून राहिला. परिसरातील काही नागरिकांनी दूरून या घटनेचा व्हिडिओही तयार केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या व्हिडिओची अधिकृत पुष्टी पोलिसांनी केलेली नाही. माहिती मिळाल्यानंतर माणक चौक पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पोहोचून परिसराची पाहणी केली, पुरावे गोळा केले आणि आरोपी असगर अली याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. त्यानंतर महिलेचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून आरोपी, त्याचे नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू असून फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. माणक चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी विक्रम सिंह चौहान यांनी सांगितले की, एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे महिला मृतावस्थेत आढळली. प्राथमिक तपासात पतीने धारदार चाकूने तिचा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आणि चौकशीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT












