Crime News : एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची तिच्याच घरात गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. घटनेच्या वेळी ही विद्यार्थिनी घरात एकटीच होती. या प्रकरणात तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी आरोपी प्रियकर देवांश पाठक याला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
मोठी बहीण कॉलेजमधून आली अन्...
मृत अल्पवयीन मुलगी बीसीए (BCA) प्रथम वर्षात शिकत होती. घटनेच्या दिवशी तिचे आई-वडील मूळ गावी गेले होते. तिची मोठी बहीण जेव्हा कॉलेजमधून घरी परतली, तेव्हा पहिल्या मजल्यावर बहिणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून तिला प्रचंड धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासासाठी आवश्यक ते पुरावे गोळा केले.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात वातावरण फिरलं, 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट
तु दुसऱ्याशी का बोलतेस?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपी देवांश पाठक याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी आणि मृत मुलगी गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी एकत्र शिक्षणही घेतले होते. मात्र, मृत विद्यार्थिनी दुसऱ्या एका तरुणाशी बोलत असल्याचा संशय देवांशला आला होता. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता आणि एकमेकांशी बोलणेही बंद झाले होते. बुधवारी (5 जुलै) दुपारी देवांश संभाषणाच्या बहाण्याने तिच्या घरात शिरला. तिथे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात देवांशने चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली.
हे ही वाचा : Personal Finance: महिन्याच्या पहिल्या 7 दिवसांत करा हे 7 आर्थिक निर्णय, तरच...
हत्येपूर्वी बलात्कार
या घटनेनंतर मृत विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबाचा जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी प्रकरणात बीएनएसचे कलम 66 आणि पोक्सो (POCSO) कायद्याची कलमे वाढवली आहेत. पोलिसांनी आरोपीच्या माहितीवरून हत्येत वापरलेला चाकू आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत. सध्या आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ADVERTISEMENT












