Pune Crime News : पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून धक्कादायक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये सागर गायकवाड या तरुणाची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात एका तरुणीवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला असून ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणात दिनेश महादेव झांबरे याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दिनेश आणि जखमी तरुणी यांचे शाळेपासून प्रेमसंबंध होते. दोघेही बीसीएच्या शिक्षणासाठी पुण्यात आले होते. मात्र, पुण्यात आल्यानंतर या तरुणीची सागर गायकवाडसोबत जवळीक वाढली. तरुणी सागरसोबत पीजीमध्ये राहण्यासाठी आली होती. त्यामुळे दिनेश आणि सागर यांच्यातील वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'तू त्याच्यासोबत का बोलतेस?' 17 वर्षीय मैत्रिणीचा घरात घुसून चिरला गळा अन्...
सागरला भेटायचंय म्हणून आला अन् थेट केला मर्डर
हिंजवडीतील या पीजीमध्ये सागर गायकवाड गेल्या चार दिवसांपासून मॅनेजर म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री संबंधित तरुणी एका महिन्यासाठी पीजीमध्ये राहण्यासाठी आली. तिने पीजी संचालकाला सागर हा तिचा प्रियकर असल्याचे सांगितले. त्यानंतर सागरने तिला तिसऱ्या मजल्यावरील 310 क्रमांकाच्या खोलीत राहण्याची व्यवस्था करून दिली. दुसऱ्या दिवशी दुपारी दिनेश महादेव झांबरे हा पीजीमध्ये आला. त्याने कर्मचाऱ्यांना सागरला भेटायचे असल्याचे सांगितले. तसेच त्याची प्रेयसी याच पीजीमध्ये राहत असल्याचेही त्याने सांगितले. कर्मचाऱ्यांनी सागर तिसऱ्या मजल्यावर असल्याचे सांगितल्यानंतर दिनेश थेट तिसऱ्या मजल्यावर गेला.
हेही वाचा : Personal Finance: महिन्याच्या पहिल्या 7 दिवसांत करा हे 7 आर्थिक निर्णय, तरच...
संपूर्ण घटना पीजीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर काही वेळातच पीजीमध्ये आरडाओरड आणि किंचाळण्याचे आवाज ऐकू आले. लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा सागर जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. दिनेश त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत होता. आरोपीने सागरवर तब्बल 13 ते 14 वेळा रॉडने वार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या हल्ल्यात सागरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दिनेशने त्याच तरुणीवरही जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना पीजीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या प्रकरणातील लव्ह ट्रँगल आता तपासाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे. दिनेश आणि जखमी तरुणी यांचे शाळेपासून प्रेमसंबंध होते. दोघे बीसीएच्या शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतरही त्यांचे संबंध होते. मात्र, याच काळात तरुणीची सागरसोबत जवळीक वाढली. त्यानंतर ती सागरला भेटण्यासाठी आणि पीजीमध्ये राहण्यासाठी आली होती. ही माहिती मिळाल्यानंतर दिनेश पीजीमध्ये पोहोचला आणि त्याने सागरवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. म्हणजेच, एका तरुणीच्या प्रेमसंबंधात तिचा जुना प्रियकर दिनेश आणि सागर हे दोघे आले आणि या वादातून सागरची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी दिनेश महादेव झांबरे याला पोलिसांनी अटक केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












