न्याय मागायला गेलेल्या महिलेवर पोलिसाकडून लैंगिक अत्याचार अन्..

Crime News : जमिनीवरून झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेनं पोलीस अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. पीडित महिला न्याय आणि मदतीच्या आशेने पोलिसांकडे गेली होती, मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 09:33 AM • 19 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मदतीचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार 

point

कोणाला सांगितल्यास हत्या करण्याची दिली धमकी 

Crime News : ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यात पोलीस प्रशानाला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला. जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेनं पोलिसांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. संबंधित पोलीस हा ओडिशातील सारणकुल पोलीस ठाण्यातील असल्याचं सांगण्यात येतंय. पीडितेचं म्हणणं असं की, ती जमीन प्रकरणाच्या न्याय आणि मदतीच्या आशेने पोलिसांकडे गेली होती, मात्र तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 13 वर्षीय मुलाने 9 वर्षीय मुलीला मंदिरामागे नेत नको तेच..

मदतीचे आमिष दाखवून पोलिसाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार 

महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार, जमिनीच्या वादावर चर्चा झाली होती, अशातच सारणकुल पोलीस ठाण्यात गेल्यानंतर ठाणेदार सुजित कुमार दास यांनी महिलेला मदतीचे आमिष दाखवून भाड्याच्या घरात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

कोणाला सांगितल्यास हत्या करण्याची दिली धमकी 

पीडितेनं असा आरोप केला की, घटनेनंतर आरोपी अधिकाऱ्याने जर तिने या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास मृत्यूंदंडासह गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. भीती आणि दबावाने काही काळ शांतच राहिली होती, नंतर या प्रकाराबाबत पीडितेनं घटनेबाबतची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली होती. 

हे ही वाचा : गे डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् खोलीत 7 जण..

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक रहिवाशांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला आहे. 

दरम्यान, नयागढचे पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. संबंधित आरोप खरे ठरल्यास आरोपीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.