Crime News : दिल्लीतील एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेच्या फोटोचा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले आहेत. नंतर तोच व्हिडिओ व्हॅट्सअॅपवरील ग्रुपवर शेअर करत व्हायरल केला. दरम्यान, महिलेच्या आरोपांनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पार्टीदरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता, या घटनेनं पीडिता आणि कुटुंब मानसिकदृष्ट्या खचलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "ओमराजे रिलस्टार नाही, तर...", एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक
महिला पीडितेचा मॉर्फ अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केला
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अश्लील व्हिडिओ बनवण्यात आलेल्या महिलेचं वय वर्षे 39 आहे. संबंधित महिला ही राजोरी गार्डन परिसरातच राहत होती. तक्रारीत तिनं नमूद केलं की, तिच्या व्हॅट्सअॅपच्या ग्रुपवर तिचा मॉर्फ अश्लील व्हिडिओ बनवून शेअर करण्यात आला होता, असा पीडितेचा आरोप आहे.
शाळेतील मैत्रिणीकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती
पीडितेच्या आरोपांनुसार, 18 मार्च रोजी शाळेतील मैत्रिणीने अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचं सांगितलं. तपासानंतर समजलं की, आरोपींनी 7-8 लोकांचा एक व्हॅट्सग्रुप बनवला होता. पीडितेला जाणुनबुजून मानसिक त्रास दिला जात होता. शरमेच्या भीतीनं पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना मानसिक तणावाचा सामना करावा लागला होता.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली, पण 3 आमदारांची दांडी; कोण-कोण राहिलं गैरहजर?
सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं की, ज्या नंबर वरून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, तो नंबर सचिन तंवर या नावाचा होता. ओळख लपवण्यासाठी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी दुसऱ्या नंबरचा वापर करण्यात आला होता. पोलीस व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावरून डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पुरावे गोळा करत आहेत.
ADVERTISEMENT











