Crime News : बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बहादुरपूर ठाणे क्षेत्रातील सिनुआरा गावात चार अल्पवयीन मुले संशयितपणे आढळून आली होती, त्यांचे पाय साखळीने बांधले होते आणि पायात कुलूप लावण्यात आले होते. लहान मुलांची परिस्थिती पाहून ग्रामस्थ देखील हादरून गेले, नंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यानंतर पूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला आणि मदरशातील क्रूरता समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रेवतीच्या विवाहाचे 'हे' खास फोटो पाहिलेत का?
चारही मुलांच्या पायात साखळदंड आणि कुलूप
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, लहान मुलं रखरखत्या उन्हात अनवाणी चालत होते. लोकांच्या त्यांच्या पायात साखळी पाहिली आणि कुलूप लावलेले पाहिले असता, त्यांच्या लक्षात आले की, त्यांनी तात्काळपणे त्यांच्याशी विचारपूस केली. मुलांनी सांगितलं की, ते दरभंगा येथील पेपर मिल पोलीस ठाणे परिसरातील मदरसा सैफुल उलूमचे विद्यार्थी आहेत. ही चारही मुले मधुबानी जिल्ह्यातील अरारिया संग्राम गावातील रहिवासी असल्याचे सांगितले.
मुलांना ओलीस ठेवून विरोध करत मारहाण
मुलांनी गावकऱ्यांना सांगितलं की, मदरशाचे संचालक मौलाना कादिर यांनी त्यांना ओलीस ठेवून विरोध करत मारहाण केली. मुले पळून जायचे म्हणून त्यांचे पाय साखळदंडांनी बांधले आणि कुलूप लावून त्यांना बांधून ठेवले. ग्रामस्थांनी तात्काळपणे पोलीस आणि चाइल्ड लाइला याबाबतची माहिती दिली, नंतर मुलांना उपचार आणि संरक्षणासाठी पाठवले.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित चार मुला कशीबशी मदरशातून निसटून गेली आणि बराच वेळ चालत होती. उष्णता आणि भुकेनं थकून गेली होती. पीडित मुलं अत्यंत बिकट परिस्थितीत होती. ग्रामस्थांनी मिळून त्यांना अन्न आणि पाणी दिले आणि घटना ऐकून ते आश्चर्यचकीत झाले.
हे ही वाचा : ..अन्यथा 5 जुलै पासून उपोषण, आण्णा हजारेंचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा
मुलांनी असा देखील आरोप केला की, प्रतिकार केल्यास त्यांना लाठी काठ्यांनी मारहाण केली. नंतर शारीरिक छळ केला. या घटनेची पोलिसांना माहिती कळवण्यात आली होती. दरम्यान, बहादूरपूर पोलीस ठाणे आणि चाइल्ड लाइन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलांची मुलाखत घेत वैद्यकीय तपासणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने सांगितलं की, मुलांची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असून प्रकरणाचे गांभीर्याने चौकशी केली जाणार आहे.
ADVERTISEMENT











