रेवतीच्या विवाहाचे 'हे' खास फोटो पाहिलेत का?

Revati Sule Photo : सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच रेवती सुळे यांचे कधीही न पाहिलेले फोटो पाहा. 

ADVERTISEMENT

google news
Revati Sule And sarang Lakhani Marriage Photo

1/7

सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यात शाहरूख खानपासून राहुल गांधी ते उद्योगपती अदानींपर्यंत अशा दिग्गजांनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच रेवती सुळे यांचे कधीही न पाहिलेले फोटो पाहा. 
 

Revati Sule And sarang Lakhani Marriage Photo

2/7

रेवती सुळे ही सुप्रिया सुळे यांची कन्या म्हणजेच राष्ट्रीय नेते शरद पवार यांची नात आहे. तिनं बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा प्रचार देखील केला होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माजी विद्यार्थिनी अशी त्यांची ओळख आहे.

Revati Sule And sarang Lakhani Marriage Photo

3/7

सारंग लखानी हे उच्च शिक्षित असून त्यांनी 2014 मध्ये नागपूर विद्यापीठातून बी-कॉममधून पदवीचे शिक्षण घेतली. आयआयएम बंगळुरूमधून व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले. मे 2023 या वर्षात त्यांनी अमेरिकेतील नामांकित कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीएचे शिक्षण घेतले. ते एक उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत, तसेच आता 'विश्वराज ग्रुप'मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत.
 

Revati Sule And sarang Lakhani Marriage Photo

4/7

या फोटोत रेवती सुळे एका आरशात पाहताना दिसत आहेत, तसेच त्यांच्या शेजारी पती सारंग लखानी आणि एका बाजूला सासू वंदना लखानी दिसत आहेत.  
 

Revati Sule And sarang Lakhani Marriage Photo

5/7

रेवती सुळे यांच्या विवाह समारंभातील फोटोची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेकांचे त्या फोटोकडे लक्ष वेधलं आहे. 
 

Revati Sule And sarang Lakhani Marriage Photo

6/7

लेकाच्या लग्नात वंदना यांनी जांभळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. तर सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीची हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली दिसून येते. 
 

Revati Sule And sarang Lakhani Marriage Photo

7/7

रेवती आणि सारंग यांना त्यांच्या पुढील संसारासाठी दिग्गजांनी आशीर्वाद दिले. अखेर रेवती सुळे आता लखानींची सून झाली. 

रिलेटेड चित्र गॅलरी