अल्पवयीन मुलगी जंगलात बेशुद्धावस्थेत आढळली, श्वानामुळे भयानक घटना उघडकीस

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी श्वान पथकातील मेरी या श्वानाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील या घटनेत काय घडलं, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

मुंबई तक

23 Jun 2026 (अपडेटेड: 23 Jun 2026, 10:53 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलगी जंगलात बेशुद्धावस्थेत आढळली

point

श्वानामुळे भयानक घटना उघडकीस

Crime News : एका सहा वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीस दलातील विशेष प्रशिक्षित श्वान 'मेरी'ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांसमोर मोठे आव्हान बनलेल्या या गुन्ह्याची उकल मेरीच्या अचूक शोधामुळे झाली. आरोपीपर्यंत पोहोचण्यात मोलाची मदत केल्याबद्दल मेरीला 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवले आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

जंगलाजवळ बेशुद्धावस्थेत

मिळालेल्या माहितीनुसार, एक सहा वर्षांची मुलगी 18 जून रोजी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. ती बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोध मोहिमेदरम्यान ही मुलगी घरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर जंगलाजवळ बेशुद्धावस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तिला तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्याच रात्री घटनास्थळ सील केले आणि दुसऱ्या दिवशी फॉरेन्सिक टीमने तेथून पुरावे गोळा केले, ज्यात एक गमछा जप्त करण्यात आला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा : निधीची बोंबाबोंब करणाऱ्या 'त्या' 6 खासदारांनी तुमची किती कामे केली?

'मेरी'ने असा शोधला आरोपी

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी श्वान पथकाला पाचारण केले. गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला गमछा पोलीस श्वान 'मेरी'ला हुंगवण्यात आला. त्या कपड्याचा वास घेताच मेरीने शेतातून आणि जंगलातून मार्ग काढत एका विशिष्ट दिशेने धाव घेतली आणि ती पोलीस पथकाला थेट संदीप नावाच्या तरुणाच्या घरापर्यंत घेऊन गेली. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा कुटुंबीयांनी संदीप घरात नसल्याचा दावा केला. मात्र, पोलिसांच्या हालचालींची कुणकुण लागताच त्याने तिथून पळ काढल्याचे तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली आणि संशयिताचा शोध घेत असताना आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टाही जप्त केला आहे.

हे ही वाचा : Pune Metro : अगरबत्तीचे चटके, नातीसोबत लैंगिक संबंध आणि कोर्टाच्या फेऱ्या

विशेष सन्मान

पोलिसांनी सांगितले की, मेरी ही तिच्या बॅचची सुवर्णपदक विजेती श्वान असून तिने यापूर्वीही अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली आहे. बिलासपूरच्या जंगलातील खून प्रकरण आणि संभल येथील एका अज्ञात हत्या प्रकरणाचा छडा लावण्यातही मेरीने पोलिसांना महत्त्वपूर्ण सुगावा मिळवून दिला होता. यावेळी बलात्काराच्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात तिची भूमिका निर्णायक ठरल्याने तिचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. वैज्ञानिक तपास, फॉरेन्सिक पुरावे आणि श्वान पथकाच्या मदतीने या प्रकरणाचा यशस्वी खुलासा करण्यात आला असून आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.