जावई करत होता मुलीला मारहाण, सासऱ्याला बघवलं नाही, शेवटी घडलं भयानक हत्याकांड

जावई आपल्या मुलीला मारहाण करतोय हे सासऱ्याला बघवले नाही. त्याने जावयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र जावई प्रचंड चिडलेला असल्याने तो थांबलाच नाही. या भांडणाचं पर्यवसान एकजणाच्या हत्येत झाले.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 04:43 PM • 01 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

जावई करत होता मुलीला मारहाण

point

सासऱ्याला बघवलं नाही

point

शेवटी घडलं भयानक हत्याकांड

Crime News : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपल्या मुलीला मारहाणीपासून वाचवण्यासाठी मध्यस्थी करणे सासऱ्याच्या जीवावर बेतले. संतापाच्या भरात जावयाने आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या केली आहे. 50 वर्षीय राम जतन असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (30 एप्रिल) रात्री घडलेल्या या थरारानंतर आरोपी जावई संदीप सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

नवरा बायकोत वाद अन् सासऱ्याची मध्यस्थी

मिळालेल्या माहितीनुसार, राम जतन यांची मुलगी नंदिनी गुरुवारी नवरऱ्यासोबत म्हणजेच संदीपसोबत माहेरी सीमापुरी येथे आली होती. रात्रीच्या वेळी क्षुल्लक कारणावरून संदीप आणि नंदिनीमध्ये वाद झाला, ज्याचे रूपांतर मारहाणीत झाले. संदीप आपल्या बायकोला बेदम मारहाण करत असताना, वडील राम जतन यांनी मध्यस्थी करून आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे संतापलेल्या संदीपने सासर्‍यावरच हल्ला चढवला.

हे ही वाचा : मिसिंग लिंकला किती कोटींचा खर्च आला? त्याला नाव काय देणार? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले...

पहिल्या मजल्यावरुन फरफटत खाली

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला संदीपने राम जतन यांना जोरात कानाखाली मारली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने सासर्‍याला पहिल्या मजल्यावरून फरफटत खाली गल्लीत नेले. तिथे त्याने आपल्याकडे असलेल्या चाकूने राम जतन यांच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राम जतन यांचा आक्रोश ऐकून शेजारी धावून आले. लोकांना जमा झालेले पाहून आरोपी संदीपने घटनास्थळावरून पळ काढला.

हे ही वाचा : Govt Jobs : ITI उत्तीर्णांसाठी आनंदाची बातमी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कामाची संधी, 'असा' करा अर्ज

फरार जावयाचा शोध

जखमी अवस्थेत राम जतन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सीमापुरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी संदीपला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. किरकोळ वादाचे रूपांतर अशा भीषण हत्येत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.