Crime News : देशाची राजधानी दिल्ली येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिथे दररोज महिला-मुलींचे लैंगिक शोषण केले जाते. आता तर क्रूरतेच्या सर्वच सीमा ओलांडल्याचं चित्र आहे. एका 12 वर्षीय मुलावर चौघांनी मिळून लाठी-काठीने मारहाण करत लैंगिक आत्याचार केला. एवढंच नाही,तर पीडित मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हैवानांनी रॉड टाकला. अशातच पोलिसांनी प्रकरण लक्षात घेत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'आई दादासोबत खिडकी बंद करून..', आईचे-मुलाशी अनैतिक संबंध असल्याचा बापाला संशय; पोराचा झोपेत...
12 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण आणि लैंगिक अत्याचार
दिल्ली महिला आयोग अध्यक्षा स्वामी मालीवाल यांनी रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. देशाची राजधानी दिल्लीच्या सीलमपूर परिसरात चार नराधमांनी 12 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली, नंतर त्याच्यावर सामूहिक अत्याचार केला. नंतर त्यांनी ट्विटवर लिहिलं की, दिल्लीत आता मुलं देखील सुरक्षित नाहीत. दिल्ली महिला आयोगाच्या पथकाने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली, तीन जण अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : भाजप नेत्याचं कांड, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीचं वारंवार लैंगिक शोषण, कुटुंबीयांनी देखील.. लाज आणणारी घटना
गुप्तांगात रॉड घालत नराधमांनी ओलांडली क्रूरतेची परिसिमा
संबंधित प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीत मालिवाल यांनी सांगितलं की, तक्रारदार महिलेला दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर रोजी चौघांनी मिळून मुलावर सामूहिक अत्याचार केला आणि गुप्तांगात रॉड घातला. त्यांनी पीडित मुलाला लाठी-काठीने मारहाण केली. नंतर मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुखांनी दिल्ली पोलिसांकडून 28 सप्टेंबर रोडी एफआरआयच्या प्रतसह केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मागण्यात आला होता.
ADVERTISEMENT











