बायकोकडून छळ अन् IAS मेहुणीचा 'तो' हुकूम, न्यायाधीशाने केली आत्महत्या; वडिलांचा खळबळजनक खुलासा

वडिलांनी सांगितले की, घटनेच्या रात्री सुमारे 10 वाजता अमनचा फोन आला होता. फोनवर त्यांनी म्हटले की, ते खूप त्रासलेले असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. मुलाचे बोलणे ऐकताच वडिलांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि धीर दिला.

Delhi Judge Suicide

Delhi Judge Suicide

मुंबई तक

03 May 2026 (अपडेटेड: 03 May 2026, 11:19 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बायकोकडून छळ अन् IAS मेहुणीचा 'तो' हुकूम

point

न्यायाधीशाने केली आत्महत्या

point

वडिलांचे गंभीर आरोप

Delhi Judge Suicide : दिल्लीच्या सफदरजंग परिसरात न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या खळबळजनक घटनेनंतर मृताच्या वडिलांनी दिलेली माहिती समोर आल्याने हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार, अमन दीर्घकाळापासून मानसिक तणावाखाली होते आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे अत्यंत त्रस्त होते.

हे वाचलं का?

वडिलांनी सांगितले की, घटनेच्या रात्री सुमारे 10 वाजता अमनचा फोन आला होता. फोनवर त्यांनी म्हटले की, ते खूप त्रासलेले असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. मुलाचे बोलणे ऐकताच वडिलांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि धीर दिला. मात्र, मुलाची परिस्थिती पाहून ते तात्काळ अलवरहून दिल्लीला रवाना झाले आणि रात्री 12 च्या सुमारास घरी पोहोचले.

IAS मेहुणीचा हुकूम

घरी पोहोचल्यानंतर अमन यांनी वडिलांना सांगितले की, पत्नीसोबत गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरू होता आणि त्यांना छळवणूक झाल्यासारखे वाटत होते. वडिलांच्या म्हणण्यानुसार, अमनची पत्नी देखील एक न्यायालयीन अधिकारी असून घरात त्यांचा मोठा दबदबा होता. याशिवाय घरात सुनेची आयएएस (IAS) बहीण म्हणजेच अमनची मेहुणी निधी हिचाही हुकूम चालायचा. घरात प्रत्येक निर्णय निधीच्या मर्जीनेच होतो आणि मी स्वतःला हतबल समजत आहे, असेही अमनने म्हटले होते. निधी जम्मूमध्ये कार्यरत आहे.

वडिलांचा असा आरोप आहे की, जेव्हा त्यांनी सुनेशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने त्यांना घरातून निघून जाण्याची धमकी दिली आणि जर ते गेले नाहीत तर पोलिसांना बोलावू असे सांगितले. यानंतर वडिलांनी सुनेच्या आई-वडिलांशी आणि इतर नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप केला नाही. अगदी सुनेच्या काकांनीही मदत करण्यास नकार दिला.

हे ही वाचा : एकीकडे नातेवाईकाचं लग्न उत्साहात सुरु, दुसरीकडे जावई अन् सासू शेतात आक्षेपार्ह अवस्थेत सापडले, अन्...

नवरा बायको वेगवेगळ्या रुममध्ये

रात्रभर घरात तणावाचे वातावरण होते. वडिलांच्या म्हणण्यानुसार, अमन एका खोलीत होते आणि त्यांची पत्नी दुसऱ्या खोलीत होती. यादरम्यान वाद आणि आरडाओरडा ऐकू येत होता, तर अमन रडत होते. काही वेळाने जेव्हा अमन दिसले नाहीत, तेव्हा वडिलांना काळजी वाटली. त्यांनी मुलाच्या मोबाईलवर कॉल केला, ज्याची रिंग बाथरूमच्या आतून ऐकू आली.

हे ही वाचा : पुण्यात शिकायला आलेल्या संगमेश्वरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी युसूफ सय्यदला अटक

बाथरूममध्ये आढळला अमन यांचा मृतदेह

दरवाजा तोडून आत पाहिले असता अमन हे फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी पत्नीच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सर्व बाजू लक्षात घेऊन तपास केला जात असून, जे काही तथ्य समोर येतील त्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.