Crime News : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील मलकाजगिरी परिसरातून एक अत्यंत थरारक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका प्लंबरने 47 वर्षीय महिला मजुराची हत्या करून तिचा मृतदेह स्वयंपाकघरातील फरशीखाली विटांच्या साहाय्याने गाडून टाकला. तब्बल पाच महिने हा गुन्हा जगापासून लपून राहिला; मात्र घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे या भयानक प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्लंबरला अटक केली असून, त्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
ADVERTISEMENT
एकत्र बसून मद्यपान केले अन्..
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या कुटुंबापासून वेगळा भाड्याच्या घरात एकटाच राहत असे. एका मजूर अड्ड्यावर त्याची ओळख पीडित महिलेशी झाली होती. दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि अधूनमधून एकत्र मद्यपानही करत असत. 15 डिसेंबर 2025 रोजी काम न मिळाल्याने दोघांनी आरोपीच्या घरी बसून मद्यपान केले. यावेळी महिलेने आरोपीच्या खासगी आयुष्याबद्दल काही अपमानजनक टिप्पणी केली. या वादातून संतापलेल्या आरोपीने महिलेच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केला, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : पुणे : 3 वर्षीय चिमुरड्याची बलात्कार करुन निर्घृण हत्या, बॅगेत लपवला मृतदेह; अल्पवयीन आरोपीला अटक
मृतदेह पुरला आणि झाला फरार
हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला. त्याने महिलेचे हात, पाय आणि मान दोरीने बांधली आणि स्वयंपाकघराच्या जमिनीखाली खड्डा खोदून मृतदेह त्यात पुरला. त्यावर विटांचे बांधकाम करून त्याने जागा व्यवस्थित केली आणि घराला कुलूप लावून तो फरार झाला. विशेष म्हणजे, पीडित महिलेचा तिच्या कुटुंबाशी फारसा संपर्क नसल्याने ती बेपत्ता असल्याची कोणतीही तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली नव्हती, ज्यामुळे आरोपीला इतके दिवस मोकळे फिरणे सोपे झाले.
हे ही वाचा : दारूत मिसळण्यास पाणी न दिल्याने 9 वर्षाच्या मुलाची गोळी झाडून हत्या, बारश्याच्या कार्यक्रमात उडाली खळबळ...
घरमालकाला आला संशय
या भीषण गुन्ह्याचा उलगडा 17 एप्रिल रोजी झाला, जेव्हा अनेक महिने आरोपी परत न आल्याने घरमालकाने घराचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करताच प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. यानंतर स्वयंपाकघरात खोदकाम केले असता महिलेचा सांगाडा आढळून आला. मलकाजगिरीचे पोलीस उपायुक्त (DCP) सी. श्रीधर यांनी सांगितले की, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 1 मे रोजी जुबली बस स्थानक परिसरातून आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT











