Dombivli Crime : आधी चोरी केली, नंतर 8 वर्षाच्या मुलीला…; डोंबिवलीतील थरार सीसीटीव्हीत कैद

मिथिलेश गुप्ता

28 Nov 2023 (अपडेटेड: 28 Nov 2023, 06:18 AM)

डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुण चोरीच्या उद्देशाने एका घरात घुसले. त्यांनी घरात असलेल्या आठ वर्षीय मुलीचे हात, पाय आणि तोंड बांधून चोरी केली.

Dombivali Crime Case first theft then attempted kidnapping of 8-year-old girl Accused who attacked captured in CCTV

Dombivali Crime Case first theft then attempted kidnapping of 8-year-old girl Accused who attacked captured in CCTV

follow google news

Dombivali Case of Theft : डोंबिवलीत (Dombivali Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुण चोरीच्या उद्देशाने एका घरात घुसले. त्यांनी घरात असलेल्या आठ वर्षीय मुलीचे हात, पाय आणि तोंड बांधून चोरी केली. चोरट्यांनी मुलीलाही सोबत नेण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या वेळी मुलीचे आई-वडील घरी नव्हते. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. (Dombivali Crime Case first theft then attempted kidnapping of 8-year-old girl Accused who attacked captured in CCTV)

हे वाचलं का?

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात एका डॉक्टरच्या घरी ही घटना घडली. डॉक्टर त्यांच्या दवाखान्यात गेले होते. त्याचवेळी त्यांची पत्नी काही कामानिमित्त शेजाऱ्याच्या घरी गेली होती. डॉक्टरांची 8 वर्षांची मुलगी घरी एकटी होती. यावेळी, एक आरोपी घरात घुसला तर दुसरा पहारा ठेवण्यासाठी घराबाहेर थांबला.

वाचा : Prithviraj Chavan : “राष्ट्रवादीने सरकार पाडले नसते, तर मराठा आरक्षणाचा…”

मुलीचे हात पाय बांधून केली चोरी

एक आरोपी घरात घुसला तेव्हा मुलगी वॉशरूममध्ये गेली होती. चोराची नजर तिच्यावर पडली. त्याने तिला वॉशरूममधून ओढत बाहेर काढले. तिचे हात, पाय आणि तोंड बांधून तिला बाल्कनीत बसवलं. घराचा हॉल आणि बेडरूमची झडती घेतली. घरातील मंदिराच्या कप्यात ठेवलेले आठ तोळ्यांचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम चोरट्यांना सापडली.

मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न

यानंतर चोरट्याने त्याच्या मित्रालाही आत बोलावले. दोघांनी चोरीच्या मालासह मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने स्वत:ला वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि चोरट्यांनी तिला घरात सोडून पळ काढला. आई घरी पोहोचल्यावर मुलीने तिला सर्व प्रकार सांगितला.

वाचा : Dharmveer 2 : ‘सिनेमा आवडो न आवडो आता…’,CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

सीसीटीव्हीत दिसले चोर, Pocso कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!

महिलेने या घटनेची माहिती पतीला दिली. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस कर्मचारी अशोक होनमाने यांनी सांगितले की, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण या घटनेत अल्पवयीन मुलीची सुरक्षा धोक्यात आली होती.

वाचा : Murder Case : मित्राच्या बहिणीवर जडलं प्रेम, भावाने मित्राचाच घेतला जीव!

घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन्ही चोरट्यांचे तेहरे दिसत आहेत. पोलिसांनी रेकॉर्डिंग फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दोघांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

    follow whatsapp