Pune Crime : WhatsApp आणि 900 अश्लील व्हिडिओ..., पुण्यात मुलींच्या हॉस्टेलमध्ये चाललंय काय?

मुंबई तक

09 May 2024 (अपडेटेड: 09 May 2024, 03:58 PM)

Pune Crime News: , पुण्याच्या प्रसिद्ध COEP कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. 1 मे च्या रात्री हॉस्टेलमधील सर्व विद्यार्थींनी एकत्र गोळा होऊन आरोपी तरूणीची चौकशी केली होती. कारण विद्यार्थीनींना या तरूणीवर चोरून व्हिडिओ आणि फोटो काढल्याचा संशय होता. या संशयातूनच विद्यार्थीनींनी तिचा फोन तपासला असता, तिच्या फोनमध्ये तब्बल 900 हून अधिक फोटो आणि व्हिडिओ आढळले होते.

pune crime news pune student girls hostel allegedly record obsence videos photo shocking crime story

विद्यार्थीनींना या तरूणीवर चोरून व्हिडिओ आणि फोटो काढल्याचा संशय होता.

follow google news

Pune Crime News: विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजच्या हॉस्टेलमधील एका तरूणीने चोरून विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून बॉयफ्रेंडला पाठवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर या दोघांनी हे मिळून हे व्हिडिओ  आणि फोटो सोशल मीडियावरही शेअर केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी आता विद्यापीठाने (Unniversity) कठोर कारवाई करत आरोपी तरूणीला काँलेजमधून काढून टाकलं आहे. तसेच आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.  (pune crime news pune student girl hostel allegedly record obsence videos photo shocking crime story) 

हे वाचलं का?

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्याच्या प्रसिद्ध  COEP कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. 1 मे च्या रात्री हॉस्टेलमधील सर्व विद्यार्थींनी एकत्र गोळा होऊन आरोपी तरूणीची चौकशी केली होती. कारण विद्यार्थीनींना या तरूणीवर चोरून व्हिडिओ आणि फोटो काढल्याचा संशय होता. या संशयातूनच विद्यार्थीनींनी तिचा फोन तपासला असता, तिच्या फोनमध्ये तब्बल 900 हून अधिक फोटो आणि व्हिडिओ आढळले होते. धक्कादायक म्हणजे हे व्हिडिओ आणि फोटो तिने एका तरूणाला व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केले होते. हा तरूण तिचा बॉयफ्रेंड असल्याची माहिती आहे.विद्यार्थीनींना ही बाब कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. 

हे ही वाचा : राणांना ओवेसींचे थेट आव्हान, 'सांगा कुठे यायचंय! '15 सेकंद काय...'

या घटनेला अनेक दिवस उलटून देखील कॉलेज प्रशासन काहीच कठोर पाऊल उचलत नव्हती. त्यामुळे हा वाद पुढे जाऊन सोशल मीडियापर्यंत पोहोचला होता. विद्यार्थींनींनी कॉलेज प्रशासनावर हे प्रकरण दाबण्याचा आरोप केला होता. तसेच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित केला होता. यानंतर कॉलेज प्रशासनाने या घटनेवर आपली कठोर भूमिका मांडली होती. 

घटनेच्या दुसऱ्या दिवशी कॉलेज प्रशासनाने आरोपी तरूणीला कॉलेजमधून बाहेर काढलं. आणि 3 मेला या घटनेची चौकशी करण्यासाठी एक त्रिसस्यीय समिती स्थापन केली होती. ही समिती या प्रकरणावर योग्य ती कारवाई करणार होती. पण आता या प्रकरणात दोघांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

    follow whatsapp