शाळेतला सिलिंडर चोरुन रात्री शेतात झोपले, सकाळी गावकऱ्यांच्या तावडीत सापडले, एकजण फरार

Gas Cylinder Theft : गॅसच्या तुटवड्यामुळे गॅसचोरांचा सुळसुळाट झाल्याचं देखील पहायला मिळत आहे. जालन्यात 110 गॅस सिलिंडरच्या चोरीमुळे सर्वत्र खळबळ माजली असतानाचा अजून एक घटना समोर येत आहे. एका ग्रामीण भागातील शाळेत मध्यान्ह भोजनासाठी वापरण्यात येणारा गॅस चोरी झाली होती. मात्र हा गॅसचोर अशा प्रकारे लोकांच्या तावडीत सापडला की त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.

Gas Cylinder Theft

Gas Cylinder Theft

मुंबई तक

17 Mar 2026 (अपडेटेड: 17 Mar 2026, 11:21 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाळेतला सिलिंडर चोरुन रात्री शेतात झोपले

point

सकाळी गावकऱ्यांच्या तावडीत सापडले

point

एकजण फरार

Gas Cylinder Theft : आखाती देशातील युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गॅससाठी सर्वत्र लोकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. यासोबत गॅसचा काळाबाजारही सुरु झाला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे गॅसचोरांचा सुळसुळाट झाल्याचं देखील पहायला मिळत आहे. जालन्यात 110 गॅस सिलिंडरच्या चोरीमुळे सर्वत्र खळबळ माजली असतानाचा अजून एक घटना समोर येत आहे. एका ग्रामीण भागातील शाळेत मध्यान्ह भोजनासाठी वापरण्यात येणारा गॅस चोरी झाली होती. मात्र हा गॅसचोर अशा प्रकारे लोकांच्या तावडीत सापडला की त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ?, 'त्या' एका गोष्टीसाठी एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत?

शाळेत केली गॅसचोरी

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील एका शाळेत ही गॅसचोरी झाली. सोमवारी (16 मार्च) सकाळी ही घटना उघडकीस आली. चोरांनी शाळेतील स्वयंपाक घराचे कुलूप तोडून ही चोरी केली. मात्र यानंतर असं काही घडलं की सगळेच अवाक झाले. सोमवारी पहाटे गावचे सरपंच फिरायला गेले होते. यावेळी त्यांना एक तरुण मोहरीच्या शेतात संशयास्पद रित्या गॅस सिलिंडर लपवत असल्याचे त्यांना दिसले. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि पुढं निघून गेले. 

मोहरीच्या शेतात सापडला चोर

दरम्यान, शाळेच्या परिसरात जाताच त्यांना धक्का बसला. शाळेच्या स्वयंपाक घराचा  दरवाजा त्यांना उघडलेला दिसला. यानंतर सरपंच काही लोकांना घेऊन तातडीने मोहरीच्या शेतात गेले आणि त्या तरुणाला पकडले. यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले आणि गॅसचोराला ताब्यात दिले.

हे ही वाचा : 'मी माफी मागतो...', विधानसभेत असं काय घडलं की, आव्हाडांनी थेट मागावी लागली माफी? क्रोनोलॉजी समजून घ्या!

गॅस तुटवड्यामुळे चोरीच्या घटना

पोलिस तपासात त्या गॅसचोर तरुणाने सांगितले की, तो त्याच्या लवकुश नावाच्या एका मित्रासोबत गॅस चोरण्यासाठी आला होता. गॅस तर चोरी केला मात्र पकडले जाण्याच्या भीतीने ते मोहरीच्या शेतात लपून बसले. रात्र असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांना तिथेच झोप लागली. यांनतर सकाळी लवकुश फरार झाला होता. पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील गॅसच्या तुटवड्यामुळे अशा घटना घडत आहेत. 
 

    follow whatsapp