मुलगी सतत फोनवर बोलायची, वडिलांची सटकताच विळ्याने हल्ला करत लेकीला संपवलं, आरोपीकडून गुन्ह्याचा कबुलीनामा

मुंबई तक

• 03:51 PM • 16 Mar 2026

Crime News : वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेपूर्वी हा अपघात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु रविवारी सत्य बाहेर आले, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. दरम्यान वडिलांनी मुलीची हत्या करण्यामागील कारण समोर आले आहे. 

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपीने मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला करत संपवलं

point

आरोपीकडून गुन्ह्याचा कबुलीनामा

Crime News : वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेपूर्वी हा अपघात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु रविवारी सत्य बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात घडल्याचे सांगण्यात येत आहे. वडिलांनी मुलीची हत्या करण्यामागील कारण समोर आले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे : चाकणमध्ये 32 वर्षीय महिलेवर सहा भटक्या कुत्र्यांचा हल्ला, हातापायांचे लचके तोडून कपडे फाडले, मृतदेह विवस्त्रच...

आरोपीने मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला करत संपवलं

संबंधित प्रकरणात 13 मार्च रोजी झालेल्या वादानंतर आरोपीने आपल्या मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने कबुल केले की त्याने आपल्या मुलीला फोनवर बोलवण्यावरून वारंवार इशारा दिला, परंतु जेव्हा तिने ऐकलं नाही आणि 13 मार्च रोजी त्याने तिला पुन्हा फोनवर बोलताना बघितले असता, त्यानंतर मोठा वाद झाला. 

आरोपीकडून गुन्ह्याचा कबुलीनामा

आरोपीने पोलिसांना सांगितलं की, रागाच्या भरात तिच्या कानशालीत लगावली होती. नंतर तिने प्रत्युत्तरादाखल हात उगारला असता, वडिलांना राग अनावर न झाल्याने विळ्याने तिच्यावर हल्ला करत संपवलं. या प्रकरणात आरोपीने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला होता. 

हल्ल्यानंतर, आरोपी आणि पत्नीने मुलीला तात्काळपणे रुग्णालयात नेले आणि तिला बीआरडी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला, कुटुंबाने असा दावा केला की, मुलगी घसरून विळ्यावर पडली आणि तिला जखम झाल्याचं सांगितलं. परिस्थिती बघून पोलिसांनी तपास सुरु केला. 

हे ही वाचा : शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, AI अश्लील फोटो बनवून व्हायरल करण्याची धमकी

पोलिसांच्या तपासातून समोर आले की, नातीची हत्या ही तिच्या वडिलांनी केली. तसेच हल्ल्यासाठी वापरेले शस्त्र जप्त केले. दरम्यान आरोपीला अटक केली आहे.