Lok Sabha 2024 : राणांना ओवेसींचे थेट आव्हान, 'सांगा कुठे यायचंय! '15 सेकंद काय...'

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 asududdin owaisi reply navneet rana on 15 second statement madhavi lata hyderabad bjp candidate
मी पंतप्रधान मोदींनामी पंतप्रधान मोदींना 15 सेकंदांचा वेळ देण्यास सांगतोय. 15 सेकंदांचा वेळ देण्यास सांगतोय.
social share
google news

Asaduddin Owaisi Reply Navneet Rana:  '15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, छोट्याला (अकबरुद्दीन ओवेसी) आणि मोठ्याला (असदुद्दीन ओवेसी) ते कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही, असे विधान अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले होते.या संदर्भातला नवनीत राणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. राणांच्या या विधानावर आता असदुद्दीन ओवेसीने (Asaduddin Owaisi) प्रतिक्रिया दिली आहे. '15 सेकंद नाही तर एक तास घ्या. आम्ही तयार आहोत, आम्हीही घाबरत नाही. कुठे यायचे ते सांग, आम्ही येऊ, असे आव्हानच ओवेसींनी नवनीत राणांना (Navneet Rana) दिले आहे.  (asududdin owaisi reply navneet rana on 15 second statement madhavi lata hyderabad bjp candidate)  

ADVERTISEMENT

नवनीत राणा यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीने ओवेसी यांनी त्यांना थेट आव्हानच दिले आहे.  "मी पंतप्रधान मोदींना 15 सेकंदांचा वेळ देण्यास सांगतोय. 15 सेकंद नाही तर एक तास घ्या. पंतप्रधानांना हा अधिकार आहे. आम्ही तयार आहोत, आम्हीही घाबरत नाही. कुठे यायचे ते सांग, आम्ही तिकडे येऊ, असे आव्हान ओवसींनी नवणीत राणांना दिले. तसेच तुझ्यात किती माणुसकी उरली आहे. हे देखील आम्हाला पाहायची आहे, असे ओवेसी म्हणाले. 

हे ही वाचा : Ajit Pawar : "मी शरद पवारांना सोडतच नव्हतो", अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

नवणीत राणांवर कारवाईची मागणी

नवणीत राणांवर आता एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. नवनीत राणा यांचे वक्तव्य अमरावतीच्या निवडणुकीत पराभव होत असल्याचे सूचित करते. त्यामुळे तिलाच धक्का बसला आहे. म्हणूनच ती हे सर्व सांगत आहे. पण पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडून कारवाई का केली जात नाही? कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी वारीस पठाण यांनी केली आहे. तसेच ते (भाजप) ध्रुवीकरण, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देखील वारीस पठाण यांनी लावला. 

हे वाचलं का?

दरम्यान आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला आहे. "हे लोक समाजात विष ओकत आहेत. निवडणुकीत भाजपचे सर्व नेते हेच करत आहेत,  अशी टीका चव्हाण यांनी केली आहे. 

नवनीत राणांचं विधान काय? 

 नवनीत राणा या हैद्राबादच्या भाजपच्या उमेदवार माधवी लता (Madhavi Lata) यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या. या संदर्भातला नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नवनीत राणा अकबरूद्दीन ओवेसींनी केलेल्या विधानावर बोलत आहेत. 15 मिनिटे पोलीस हटवा, काय करू शकतो दे दाखवून देऊ, असे विधान अकबरद्दीन ओवेसींनी केलं होतं. त्यावर राणा यांनी तुम्हाला 15 मिनिटे लागतील आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील, असे विधान केले आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : "एकनाथ शिंदे तुरुंगात जाणार", तडीपारीच्या कारवाईवरुन संजय राऊत भडकले

 "छोटा (अकबरुद्दीन ओवेसी) म्हणतो की, 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा आणि आम्ही काय करू शकतो ते दाखवू. मी त्या छोट्याला हेच सांगते की तुला 15 मिनिटे लागतील. पण, आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील. जर 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर छोट्याला (अकबरुद्दीन ओवेसी) आणि मोठ्याला (असदुद्दीन ओवेसी)ते कुठून आले आणि कुठे गेले हे कळणार नाही. आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील." असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT