नवऱ्यासोबत भांडून घराबाहेर पडली मजूर महिला, वाटेत झाला सामूहिक बलात्कार; हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : नवऱ्यासोबत भांडण करुन घराबाहेर पडणं हे एका महिलेला खूपच महागात पडलं आहे. नवऱ्यासोबत किरकोळ कारणावरुन भांडण झाल्याने नाराज होऊन ही महिला घराबाहेर पडली होती. यानंतर दोन नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:45 PM • 17 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्यासोबत भांडून घराबाहेर पडली

point

वाटेत झाला सामूहिक बलात्कार

point

हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : नवऱ्यासोबत भांडण करुन घराबाहेर पडणं हे एका महिलेला खूपच महागात पडलं आहे. नवऱ्यासोबत किरकोळ कारणावरुन भांडण झाल्याने नाराज होऊन ही महिला घराबाहेर पडली होती. यानंतर दोन नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथील ही घटना आहे. बलात्कारानंतर या महिलेने यमुना नदीत उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी राजकुमार आणि दुर्गेश नावाच्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे : 'माझी शेजारीण गोरीपान..', रशियन महिलेच्या रुममध्ये घुसला इंजिनिअर तरुण; पुढे काय घडलं?

जंगलात नेऊन सामूहिक बलात्कार

पीडिता वृंदावन या ठिकाणी मजूरी करते. नवऱ्यासोबत काही कारणांवरुन तिचा वाद झाला. यानंतर ती नाराज होऊन घराबाहेर पडली. यावेळी रस्त्यात तिला आरोपी भेटले. रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने दोघे पीडितेला एका जंगलात घेऊन गेले. याठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

यमुना नदीत उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न 

या कृत्यामुळे पीडितेला मानसिक धक्का बसला. आपले आयुष्य संपवण्याच्या उद्देशाने तिने यमुना नदीत उडी घेतली. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना बोलावून घेतले. यावेळी पीडितेने तिच्यासोबत झालेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली.

हे ही वाचा : सरकारी हॉस्टेलवर राहणाऱ्या तीन अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनी प्रेग्नंट, आरोपी कोण? काँग्रेसच्या आमदारांचा खळबळजनक दावा

गोळीबारात एक आरोपी जखमी 

यानंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली.  एका खबऱ्यामार्फत पोलिसांना आरोपींच्या ठिकाणाचा शोध लागला. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांना घेराव घातला. मात्र आरोपींनी पोलिसांवर गोळीबीर केला. याच्या प्रत्युत्तरादाखळ पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात राजकुमार नावाच्या आरोपीच्या पायात गोळी लागल्याने तो जखमी झाला. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

    follow whatsapp