दहावीची परीक्षा सुरु असताना शिक्षकाने सात विद्यार्थीनींशी केले अश्लील कृत्य, परीक्षेदरम्यान परिसरात गदारोळ

Crime News : यमुनानगरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याने माणुसकीला काळिमा फासली गेली आहे. एका सरकारी शाळेत इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान एका शिक्षकाने सात विद्यार्थिनींचा विनयभंग केला. 

crime news

crime news

मुंबई तक

• 02:58 PM • 17 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाचे विद्यार्थीनींसोबत अश्लील आणि असभ्य कृत्य

point

पालकांनी व्यक्त केली भीती 

Crime News : यमुनानगरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याने माणुसकीला काळिमा फासली गेली आहे. एका सरकारी शाळेत इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान एका शिक्षकाने सात विद्यार्थिनींचा विनयभंग केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर क्रूजरचा टायर फुटून भीषण अपघातात चेंदामेंदा, तिघांचा करुण अंत

शिक्षकाचे विद्यार्थीनींसोबत अश्लील आणि असभ्य कृत्य

 मॉडेल कॉलनीत शासकीय वरिष्ठ माध्यमिक शाळेत सोमवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, जेव्हा इयत्ता दहावीचा सामाजशास्त्राचा पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनी एका शिक्षकावर गंभीर आरोप करण्यात आले होते. दुपारी 12: 30 ते 3:30 च्या दरम्यान, विद्यार्थीनी परीक्षा देत असताना, कर्तव्यादक्ष असलेल्या शिक्षकाने आपली सभ्यता सोडून सात विद्यार्थीनींसोबत अश्लील आणि असभ्य कृत्य केलं.

दरम्यान, परीक्षा संपताच, जेव्हा त घाबरलेल्या विद्यार्थीनींनी आपल्या कुटुंबीयांनी धडलेला सर्व प्रकार सांगितला, ज्यामुळे कुटुंबीय संतापले आहेत. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले होते. 

पालकांनी व्यक्त केली भीती 

पीडितेच्या पालकांनी सांगितलं की, 'मुली शाळेत सुरक्षित आहेत अशा विश्वासाने आम्ही त्यांना शाळेत पाठवलं. दर आमच्या मुली शाळेत, परीक्षा देताना देखील सुरक्षित नसतील तर आम्ही त्यांना कुठे पाठवायचे? शिक्षकाने एकाच नाहीतर तब्बल 7 मुलींचा विनयभंग केला. आम्हाला न्याय हवाय आणि क्रूर माणसाला शिक्षा व्हावी, जेणेकरून पुन्हा असं धाडस कोणीच करणार नाही'

एसएचओंनी काय सांगितलं? 

दरम्यान, एसएचओ शीलावंती म्हणाल्या, 'कंट्रोल रुममार्फत आम्हाला माहिती मिळाली की, मॉडेल कॉलनी शाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग झाला. तात्काळपणे कारवाई करून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थिनींनी जबाब नोंदवले जात असून, पुराव्यांच्या आधारे योग्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणात कारवाई सुरु केली असून, दोषींना सोडले जाणार नाही'.

या घटनेनं सुरक्षा व्यवस्था आणि शिक्षकांच्या निवडीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झालेत. पोलिसांनी सध्या प्रकरणाची सखोल माहिती मिळवली आणि तपास केला. या प्रकरणी पालकाच्या मनात भीती निर्माण केली आहे. 

    follow whatsapp