पतीने मित्रांना पार्टीसाठी घरी बोलावले, फुल्ल दारु प्यायले, अन् नंतर पत्नीवर चौघांचा सामुहिक बलात्कार

gujarat crime news : पतीने आपल्या घरी दारूची मेजवानी आयोजित केली आणि आपल्या तीन मित्रांना अजय, जगो आणि चिराग यांना बोलावले. नशेत धुत झालेल्या पतीने आपल्या पत्नीला या तीन नराधम मित्रांच्या हवाली केले. धक्कादायक बाब म्हणजे, पतीच्या डोळ्यांदेखत या तिघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला आणि या पापात स्वतः पतीदेखील सामील झाला.

gujarat crime

gujarat crime

मुंबई तक

17 Mar 2026 (अपडेटेड: 17 Mar 2026, 11:40 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीने मित्रांना पार्टीसाठी बोलावले

point

फुल्ल दारु प्यायले, अन् नंतर पत्नीवर चौघांचा सामुहिक बलात्कार

gujarat crime news : एका रत्नकलाकार पतीने आपल्याच 25 वर्षीय पत्नीला विकृतपणे वागवण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अमरेली जिल्ह्यातील बगसरा येथील रहिवासी असलेल्या या पीडितेने प्रेमविवाह करून सुरतमध्ये संसार थाटला होता, मात्र तिचा पतीच तिचा शत्रू बनला. मे 2025 मधील एका रात्री पतीने आपल्या घरी दारूची मेजवानी आयोजित केली आणि आपल्या तीन मित्रांना अजय, जगो आणि चिराग यांना बोलावले. नशेत धुत झालेल्या पतीने आपल्या पत्नीला या तीन नराधम मित्रांच्या हवाली केले. धक्कादायक बाब म्हणजे, पतीच्या डोळ्यांदेखत या तिघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला आणि या पापात स्वतः पतीदेखील सामील झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : गॅस सिलिंडर चोरांचा सुळसुळाट, जालन्यात 110 सिलिंडर लंपास, नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चांना उधाण

दरम्यान, या अत्याचारानंतर आरोपींनी पीडितेला धमकी दिली की, जर तिने या घटनेबद्दल कोणालाही सांगितले, तर तिची साधी बॉडीही कोणाला मिळणार नाही. समाजात बदनामी होईल आणि जीवाला धोका निर्माण होईल या भीतीने पीडिता काही काळ गप्प राहिली, मात्र पतीची विकृती एवढ्यावरच थांबली नाही; तो वारंवार आपल्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव टाकू लागला. गुजरात मधील सुरत शहरातील कापोदरा परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली. 

अत्याचाराचा अंत आणि पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींसह तिघांना बेड्या

सततच्या या अमानवी छळाला कंटाळून अखेर पीडितेने हिंमत एकवटली आणि घर सोडून कापोदरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला. महिला सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी वेगवान तपास चक्रे फिरवली आणि पीडितेच्या पतीसह दोन मित्रांना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. प्रेमविवाहाचा असा करुण अंत आणि पतीकडूनच झालेल्या या विश्वासघातामुळे संपूर्ण सुरत शहरात संतापाची लाट उसळली आहे. कापोदरा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या गुन्ह्यातील सर्व आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर पावले उचलली जातील आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सबळ पुरावे न्यायालयात सादर केले जातील. एका स्त्रीच्या सन्मानाशी खेळणाऱ्या या नराधमांना धडा शिकवण्यासाठी पोलीस आता फरार आरोपीच्या अटकेसाठी तांत्रिक तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'मी माफी मागतो...', विधानसभेत असं काय घडलं की, आव्हाडांनी थेट मागावी लागली माफी? क्रोनोलॉजी समजून घ्या!

    follow whatsapp