देवीच्या मंडपातून चिमुकलीचे अपहरण, झुडपात लैंगिक अत्याचार 

मुंबई तक

• 08:00 AM • 21 Oct 2026

Crime News : देशभरात नवरात्रोत्सव हा सण साजरा केला जात आहे. मात्र, याच सणादरम्यान मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवीच्या मंडपातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले, नंतर त्याच मुलीवर नातेसंबंधाने काका असणाऱ्या व्यक्तीने पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

देवीच्या मंडपातून चिमुकलीचे अपहरण

point

झुडपात अत्याचार

point

आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा 

Crime News : देशभरात नवरात्रोत्सव हा सण साजरा केला जात आहे. मात्र, याच सणादरम्यान मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवीच्या मंडपातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले, नंतर त्याच मुलीवर नातेसंबंधाने काका असणाऱ्या व्यक्तीने पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जौनपुर येथील असून घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : लातूरात लव्ह ट्रँगल, प्रेयसीचा स्क्रू ड्रायव्हरने चिरला गळा

देवीच्या मंडपातून चिमुकलीचे अपहरण अन् झुडपात अत्याचार 

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील जौनपुर येथील जाफराबाद येथील पोलीस ठाणे परिसरातील आहे. मुलीच्या घराजवळच देवीचा मंडप आहे. याचदरम्यान चिमुकली ही घराजवळच्या मंडपात गेली होती. एका शेजाऱ्याने पीडितेला फसवलं आणि उचलून घेतले. त्यानंतर तिला झुडपात नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. कुटुंबीयांनी मुलगी अजून कशी इकडे तिकडे दिसत नाही अशी त्यांना चिंता वाटू लागली होती. त्यानंतर मुलीचा शोध घेणे सुरूच होते. यादरम्यान, आरोपी नराधम हा मुलीसोबत झुडपात आढळून आला होता. 

आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा 

कुटुंबीयांच्या सुचनेनुसार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. अशातच आरोपी हा केवळ त्यांचा शेजारीच नाही, तर त्या निष्पाप मुलीचा काका देखील आहे. 

हे ही वाचा : जालना: 'दोघेही पळून लग्न करू..', पीडितेनं त्रासाला कंटाळून संपवलं जीवन

संबंधित प्रकरणात शहर पोलीस अधिकारी असलेले आयुक्त सम्यक चौधरी यांच्या माहितीनुसार, आरोपीला घटनास्थळावरून अटक केली. त्याची ओळख पीडितेचा शेजारी सूरज निषाद अशी ओळख पटली आहे. घटनेदरम्यान आरोपी हा मद्यधुंदवस्थेत होता. त्याने मुलीला नदीच्या किनाऱ्यावरील एका झुडूपात फसवून नेत तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान आरोपीविरुद्ध याआधी देखील अशा घटनांबाबत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.