Crime News : एका फ्लॅटमध्ये 35 वर्षीय महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही महिला युवराज नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. युवराज आधीपासूनच विवाहित असून तो आपल्या पत्नीपासून वेगळा राहत होता. या प्रकरणात पोलिसांना हत्येचा संशय असून, घटनेनंतरपासून युवराज फरार झाला आहे. सोमवारी (19 ऑक्टोबर) सकाळी शेजाऱ्यांनी फ्लॅटच्या खोलीत महिलेचा मृतदेह पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. राजस्थानमधील जयपूर येथील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
'त्या' रात्री काय घडलं?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, रविवारी रात्री उशिरा महिला आणि युवराज यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला होता. याच वादादरम्यान महिलेवर एखाद्या जड वस्तूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, वादाचे नेमके कारण आणि मृत्यूमागची नक्की परिस्थिती अद्याप अस्पष्ट असून पोलीस सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. सोमवारी सकाळी शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
हे ही वाचा : गोकुळमध्ये सतेज पाटील यांचा विजय, हर्षदा जाधव देशमुख काय म्हणाल्या?
मृतदेह नातेवाईकांकडे
माहिती मिळताच पत्रकार कॉलनी पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) ची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
हे ही वाचा : शशिकांत चुयेकर यांनी सांगितली सतेज पाटील यांची विजयाची रणनीती
प्रियकर फरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांच्या सूचनेवरून पोलिसांनी घटना गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे. महिलेच्या हत्येचा संशय असून आरोपी युवराजचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कसून शोध मोहीम राबवत आहेत. रविवारी रात्री फ्लॅटमध्ये नेमके काय घडले, याचा शोध घेतल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा खरा उलगडा होईल.
ADVERTISEMENT












