मॉडेलला पकडण्यासाठी 50 हजारांचं बक्षीस, अखेर नागपुरात सापडली, नेमकं कोणतं कांड केलं?

योगेश पांडे

• 06:07 PM • 20 Oct 2026

Shiva Sharma death case : लखनौमधील शिवा शर्मा मृत्यू प्रकरणात फरार असलेल्या मॉडेल श्रद्धा दुबेला नागपुरातून अटक करण्यात आली. तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक तन्वीर उर्फ दानिश यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

Shiva Sharma death case

Shiva Sharma death case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मॉडेलला पकडण्यासाठी 50 हजारांचं बक्षीस

point

अखेर नागपुरात सापडली, नेमकं कोणतं कांड केलं?

Shiva Sharma death case : लखनौमधील तरुण व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरणात फरार असलेल्या मॉडेल श्रद्धा दुबेला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. श्रद्धा दुबे हिच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सुमारे 11 दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर तिघांना 20 ऑक्टोबर रोजी नागपुरातून अटक करण्यात आली. नागपूर पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेश एसटीएफ आणि लखनऊ पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. नागपूर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी अटकेला दुजोरा दिला आहे. श्रद्धा दुबे हिची शेवटची माहिती आग्रा येथून मिळाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ती आपल्या बहिणीसह आणि चालकासोबत नागपुरात आढळली. उत्तर प्रदेश पोलिसांनी कानपूर क्रमांकाच्या वाहनाचा आणि आयपी अ‍ॅड्रेसचा माग काढून आरोपींपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रणही समोर आले आहे. श्रद्धा वारंवार ठिकाण बदलत असल्याने तिचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.

हे वाचलं का?

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंनी भाजपकडून 500 कोटी घेऊन मला...”; मनोज जरांगेंनी थेट शिंदेंना आव्हान देत उडवून दिली खळबळ!

श्रद्धा दुबे सतत आपले ठिकाण बदलत होती

लखनऊ पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, हजरतगंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शिवा शर्मा हत्या प्रकरणात श्रद्धा दुबे, रश्मी दुबे आणि तन्वीर उर्फ दानिश हे तिघेही आरोपी म्हणून हवे होते. या तिघांवर प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. शिवा यांची आई रंजना शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिघांना अटक केल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नागपुरातून लखनौला आणले जात आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, श्रद्धा दुबे फरार असताना सतत आपले ठिकाण बदलत होती. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी विविध माहितीच्या आधारे तपास करण्यात आला.

हेही वाचा : ‘घँऽऽ घँऽऽ’...,दुचाकीचा आवाज अन् गोकुळ जिंकताच कोल्हापूर स्टाईलने जल्लोष; पाहा व्हिडीओ

तरुण व्यावसायिक शिवा शर्मा मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे? 

या प्रकरणाची सुरुवात लखनऊमधील तरुण व्यावसायिक शिवा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यूने झाली. शिवा यांचा एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या आई रंजना शर्मा यांनी मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रद्धा दुबे हिच्यावर मुलाच्या हत्येचा गंभीर आरोप केला. शिवा मागील चार महिन्यांपासून श्रद्धासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते, असा दावा त्यांच्या आईने केला. आरोपींनी शिवा यांना आधी मारहाण केली आणि त्यानंतर चौथ्या मजल्यावरून खाली ढकलले, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात हत्या केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रद्धा, तिची बहीण रश्मी आणि चालक तन्वीर अली उर्फ दानिश फरार झाले होते. दरम्यान, श्रद्धाने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून स्वतःची बाजू मांडली होती. शिवा यांचा मृत्यू ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा दावा तिने केला होता. आपण लपून बसलेलो नसून पोलिसांसमोर सत्य मांडू इच्छित असल्याचेही तिने म्हटले होते. आता तिघांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.