Crime News : मशीन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीची त्याच्याच बायकोने हत्या केली आहे. गोपाल असं मृताचं नाव आहे. त्याच्या पत्नीने म्हणजेच काजलने प्रियकराच्या मदतीने त्याला संपवलं. सुमारे सोळा वर्षांपूर्वी काजलने पहिल्या पतीला सोडून गोपालसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना चार मुले असून गोपाल फरीदाबादमध्ये नोकरी करत असल्याने तो अधूनमधून गावी यायचा, तर काजल मुलांसह हाथरस येथील गावी राहत होती.
ADVERTISEMENT
बाऊन्सरवर जडला जीव
या विवाहित सुखद संसारात गोपालचा मित्र आणि बाउंसर असलेला योगेंद्र याची एन्ट्री झाल्यानंतर दुरावा निर्माण झाला. योगेंद्र गोपालच्या अनुपस्थितीतही घरी येऊ लागल्याने पती-पत्नीमध्ये सतत वाद होऊ लागले आणि वाद विकोपाला गेल्याने गोपाल अनेक महिने गावी गेला नाही. या कौटुंबिक कलहातूनच काजलने योगेंद्रच्या साथीने गोपालला कायमचे संपवण्याचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे.
हे ही वाचा : पतीच्या डोळ्यादेखत वाघाने पत्नीवर केला हल्ला, नवरा बघतच राहिला अन्..
अशी केली हत्या
13 ऑक्टोबर रोजी काजल मुलांसह फरीदाबादला पोहोचली आणि तिने दुसऱ्या दिवशी योगेंद्रलाही तिथे बोलावून घेतले. 14 आणि 15 ऑक्टोबरच्या मध्यरात्री मद्याच्या नशेत गावी परतलेल्या गोपालवर, तो गाढ झोपेत असताना काजलने भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर घरात चोर घुसल्याची खोटी कहाणी रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हे ही वाचा : Govt Jobs : केंद्रीय वखार महामंडळात विविध पदांसाठी भरती, 90 हजारांहून अधिक पगार
दोघांना अटक, मुलीचा सहभाग?
फरीदाबाद पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर काजल आणि तिचा प्रियकर योगेंद्र यांचा या हत्येतील सहभाग उघडकीस आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. दरम्यान, गोपालच्या भावाने त्याच्या मुलीवरही संशय व्यक्त केला होता, मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात तिचा कोणताही सहभाग आढळला नाही. काजल गोपालपासून सुटका करून योगेंद्रशी लग्न करण्यास इच्छूक होती का, याबाबत पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












