बारामती विमानतळाजवळ शिपिंग कंपनीच्या मालकावर हल्ला, फुलांचा गुच्छ देण्याच्या बहाण्याने आले अन्...

मुंबई तक

19 Oct 2026 (अपडेटेड: 19 Oct 2026, 12:51 PM)

Baramati Crime News : बारामती विमानतळाजवळ शिपिंग कंपनीचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर फुलांचा गुच्छ देण्याच्या बहाण्याने हल्ला झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, सूर्यवंशी यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

Baramati Crime News

Baramati Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बारामती विमानतळाजवळ शिपिंग कंपनीच्या मालकावर हल्ला

point

फुलांचा गुच्छ देण्याच्या बहाण्याने आले अन्...

Baramati Crime News : बारामती विमानतळाजवळ शिपिंग कंपनीचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. फुलांचा गुच्छ देण्याच्या बहाण्याने स्कूटरवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सूर्यवंशी यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : "डरपोक लोकं, कुठेतरी लपून बसतात..", टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले?

फुलांचा गुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ जाण्याचा प्रयत्न 

बारामती विमानतळाजवळ ही घटना घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा दिलीप सूर्यवंशी हे खासगी कामासाठी बारामती येथे आले होते. त्यावेळी स्कूटरवरून दोन जण त्यांच्याजवळ आले. या हल्लेखोरांनी फुलांचा गुच्छ देण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेच्या वेळी सूर्यवंशी यांच्यासोबत त्यांचा खासगी सुरक्षारक्षकही उपस्थित होता. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी सूर्यवंशी यांच्यावर हल्ला का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा ; टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर वडील जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया आली समोर, नेमकं काय म्हणाले?

हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं काम सुरु 

या घटनेदरम्यान गोळीबार झाल्याची चर्चाही होत आहे. मात्र, आतापर्यंत गोळीबार झाल्याची पुष्टी करणारा कोणताही पुरावा मिळालेला नसल्याचे पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी सांगितले. कथित गोळीबाराच्या अनुषंगानेही तपास सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख पटवणे आणि त्यांचा शोध घेणे यासाठी पोलिसांची पथके काम करत आहेत. घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हल्लेखोरांनी फुलांचा गुच्छ देण्याच्या बहाण्याने सूर्यवंशी यांच्याजवळ जाऊन हल्ला केल्याचा आरोप असल्याने या घटनेचा तपास महत्त्वाचा ठरला आहे. पोलीस या प्रकरणातील विविध बाबींची चौकशी करत आहेत.

हल्ल्यानंतर राणा दिलीप सूर्यवंशी यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुदित सक्सेना यांनी सूर्यवंशी यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष असून, त्यानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, बारामती विमानतळाजवळ झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख, हल्ल्यामागील कारण आणि गोळीबार झाल्याच्या चर्चेबाबत तपासातून काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.