अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, शेवटी रेल्वे रुळावर सापडला मृतदेह; तरुणाची कोणी केली हत्या?

मुंबई तक

18 Oct 2026 (अपडेटेड: 18 Oct 2026, 12:59 PM)

कोचीमधील एका महिलेने आपल्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली. हत्या करुन तिने मृतदेह रेल्वे रुळांवर टाकला. यानंतर झालेल्या पोलीस तपासात एका भयंकर घटनेचा उलगडा झाला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने बायकोला संपवले

point

पोलीस तपासात धक्कादायक उलगडा

Crime News : एका रेल्वे रुळाजवळ एक मृतदेह सापडला असून, सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासले होते; परंतु पोलिसांच्या तपासानंतर हे हत्येचे प्रकरण असल्याचे उघडकीस आले. 17 ऑक्टोबरच्या रात्री एका लोको पायलटला रुळाजवळ मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. केरलममधील कोची येथील ही घटना आहे.

हे वाचलं का?

'असा' झाला उलगडा

सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी, मृतदेहाची प्राथमिक पाहणी केल्यावर पोलिसांना घातपाताचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून त्याच्या घरी धाव घेतली. तिथे मृतकाच्या पत्नीकडे चौकशी केली असता, तिच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. यानंतर झालेल्या चौकशीत मात्र भयानक प्रकरणाचा उलगडा झाला.

हे ही वाचा : सिंधुदुर्ग : बसमधून उतरली पण घरी पोहोचलीच नाही, नदीत सापडला मृतदेह, नंदिनीसोबत काय घडलं?

16 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संशयित महिलेने आपल्या पतीच्या हत्या केल्याची कबुली दिली. तिने सांगितले की, तिचा नवरा पोटच्या 16 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत होता, ज्याचा संताप आल्याने तिने त्याच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये नवऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर तिने मृतदेह ओढत नेऊन रेल्वे रुळाजवळ फेकून दिला होता. 31 वर्षीय मृत व्यक्ती ओडिसाच्या गंजम जिल्ह्याचा रहिवासी होता.

हे ही वाचा : सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह, मेहुण्यावर भररस्त्यात 23 सेकंदात 13 वार; व्हिडीओ व्हायरल

पॉक्सो अंतर्गत गुन्हा

सध्या एरणाकुलमच्या एलमक्करा पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करत आहेत. तसेच, अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवून पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत आणि महिलेच्या दाव्यांची पुष्टी करणाऱ्या पुराव्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र या प्रकरणामुळे घरातही मुली असुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे.