कोल्हापूर हादरले, 15 वर्षीय मुलीचा धारदार शस्त्राने वार करुन खून; मंदिर परिसरात क्रूरपणे संपवलं

मुंबई तक

• 03:39 PM • 18 Oct 2026

Kolhapur Crime News : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे 15 वर्षीय मुलीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. घटनेनंतर फॉरेन्सिक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून, पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे.

Kolhapur Crime News

Kolhapur Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर हादरले, 15 वर्षीय मुलीचा धारदार शस्त्राने वार करुन केला खून

point

हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील घटना

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात ही घटना घडली. माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. 

हे वाचलं का?

हेही वाचा : सिंधुदुर्ग : बसमधून उतरली पण घरी पोहोचलीच नाही, नदीत सापडला मृतदेह, नंदिनीसोबत काय घडलं?

तसेच संशयिताचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली. घटनास्थळाची तपासणी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली.

मृत मुलगी नववीच्या वर्गात शिकत होती. मंदिर परिसरात ध्वनिमुद्रणाचा आवाज सुरू असताना संशयिताने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती समोर आली आहे. हा वार गंभीर स्वरूपाचा होता. तिच्या गळ्यावर वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली. तसेच तिच्या दंडावरही वार करण्यात आला होता. या हल्ल्यात मुलगी घटनास्थळीच गतप्राण झाल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला.

हल्ल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर जखमी मुलीला तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर वैद्यकीय पथकाने तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हातकणंगले पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. श्वान पथकाच्या मदतीने संशयिताचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या प्रकरणात संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत मोहीम राबवण्यात आली.