सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह, मेहुण्यावर भररस्त्यात 23 सेकंदात 13 वार; व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

• 11:33 AM • 18 Oct 2026

एका तरुणाने आपल्या मेहुण्याची निघृण हत्या केली आहे. भररस्त्यात त्याने मेहुण्यावर 23 सेकंदात 13 वार केले. राजकोटमधील ही घटना असून मृताच्या पत्नीने भावाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह

point

मेहुण्यावर भररस्त्यात 23 सेकंदात 13 वार

point

व्हिडीओ व्हायरल

Crime News : प्रेमविवाहाच्या वादातून आणि बदला घेण्याच्या मानसिकतेतून हत्येची एक भयंकर घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच मेहुण्याची चाकूने वार करुन भररस्त्यात हत्या केली. कमलेश धांदल असं आरोपीचं नाव आहे. कमलेश याच्या बहिणीने सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. गुजरातच्या राजकोटमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव विमल वानिया (वय 27) असे आहे. विमलने सुमारे सात वर्षांपूर्वी कमलेशची बहीण शीतल हिच्याशी प्रेमविवाह केला होता. या विवाहामुळे मुलीचे कुटुंबीय संतापले होते आणि त्यांनी शीतलशी सर्व संबंध तोडले होते. मात्र, विमलने आपल्या पत्नीसाठी खरेदी केलेल्या एका वाहनाची नोंदणी करण्यासाठी सासरच्या पत्त्याचा वापर केल्यामुळे जुना राग पुन्हा उफाळून आला, ज्यातून हा संपूर्ण प्रकार घडला.

हे ही वाचा : ज्ञानेश कुमारांचा बचाव कोण करतंय? CJP च्या आंदोलनातून कोणते सवाल?

23 सेकंदात 13 वार

घटनेच्या दिवशी मुख्य आरोपी कमलेशने दुचाकीच्या कागदपत्रांच्या (आरसी बुक) बहाण्याने विमलला शहरातील एका दुकानाजवळ बोलावले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, कमलेशने विमलला दुकानातून बाहेर ओढत आणले आणि नंतर त्याच्यावर बेदम मारहाण करत चाकूने सपासप वार केले. अवघ्या 23 सेकंदात 13 वार केल्यानंतर विमल गंभीर जखमी होऊन खाली कोसळला, तर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

हे ही वाचा : नागरिकांच्या भावनेवर निकाल लागू शकत नाही, असं गवई का बोलले?

भावाला फाशीची शिक्षा द्या

या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, मृताच्या पत्नीने आपल्या भावासाठी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. जखमी अवस्थेत विमलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठी सनसनाटी पसरली आहे.