Crime News : गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. तसेच इतर तीन विद्यार्थिनींचा विनयभंगदेखील केल्याचे समोर आली आहे. याप्रकरणी नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा संतापजनक प्रकार गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील आहे.
ADVERTISEMENT
चहा बनवण्याच्या बहाण्याने बोलवायचा अन्...
रामशंकर पंड्या असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो जाफ्राबाद परिसरातील एका गावात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो मूळचा भावनगर जिल्ह्यातील तलाजा येथील वेलोद्दरचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी तो गिर सोमनाथ जिल्ह्यात पोलीस दलातही सेवेत होता. चहा बनवण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींना स्टाफ रूममध्ये बोलावून तो त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा : 'आंतरराष्ट्रीय डंका वाजवण्याची वेळ...' लंडनमधून ध्रुव राठीची हाक; कधी होणार आंदोलन?
कसं बाहेर आलं प्रकरण?
पिडीत मुलींपैकी एका मुलीने आपल्या पालकांना या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी शिक्षकाने वारंवार लैंगिक शोषण करून 21 जुलै रोजी आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती पीडितेने दिली. या तक्रारीच्या आधारे जाफ्राबाद पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोक्सो (POCSO) कायदा आणि बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून कसून चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा : तीन महिन्यापूर्वी IT जॉबसाठी पुण्यात शिफ्ट झालेल्या तरुणासोबत काय घडलं?
मिशन स्माइलमुळे मिळाली हिंमत
अमरेली पोलिसांच्या 'मिशन स्माइल' या जनजागृती मोहिमेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये मुलांना 'गुड टच आणि बॅड टच'बाबत शिकवले जाते. याच मार्गदर्शनामुळे पीडित मुलीला हिंमत मिळाली आणि तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून इतर विद्यार्थिनींसोबतही असा प्रकार घडला आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT












