पुणे : IT क्षेत्रात काम करणाऱ्या विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा

मुंबई तक

• 07:11 AM • 17 Oct 2026

Pune IT professional Trishna Sakpal suicide case : पुण्यातील 33 वर्षीय IT क्षेत्रात तृष्णा सकपाळ यांनी आत्महत्ये केलीये. या प्रकरणात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक मागण्या आणि छळाचे आरोप असून, मुंढवा पोलीस तपास करत आहेत.

Pune Crime News

Pune Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुणे : IT क्षेत्रात काम करणाऱ्या विवाहितेची आत्महत्या

point

पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा

Pune IT professional Trishna Sakpal suicide case : पुण्यातील मुंढवा परिसरात राहणाऱ्या 33 वर्षीय IT क्षेत्रातील महिला तृष्णा  सकपाळ यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्यांच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पैसे, फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेणे आणि इतर आर्थिक बाबींवरून तृष्णा यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. 

हे वाचलं का?

तृष्णा या पुण्यातील केशवनगर, मुंढवा येथे राहत होत्या. 29 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांना एक चिठ्ठी मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामध्ये तृष्णा यांनी आपल्या मृत्यूला पती आणि सासरच्या चार अन्य सदस्यांना जबाबदार धरल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, दिवाळीपूर्वी अतिरिक्त रक्क्म थेट खात्यात...

तृष्णा यांचा विवाह 2018 मध्ये राहुल संजय सकपाळ यांच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी माहेरच्या मंडळींनी त्यांना 13 तोळे सोन्याचे दागिने दिले होते. तृष्णा एका IT कंपनीत नोकरी करत होत्या. मात्र, लग्नानंतर त्यांना स्वतःचा संपूर्ण पगार पती आणि सासरच्या मंडळींना देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. याशिवाय, माहेरच्या कुटुंबाच्या मालकीचा फ्लॅट सासू वैशाली संजय सकपाळ यांच्या नावावर करण्याची मागणी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. सासरे संजय मनोहर सकपाळ यांनी एक कोटी रुपयांचा फ्लॅट स्वतःच्या नावावर खरेदी करण्यास सांगितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आर्थिक मागण्यांवरून तृष्णा यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे त्यांच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनुसार, सातत्याने होणारा कथित छळ आणि मारहाणीमुळे तृष्णा आणि त्यांचे पती 2021 मध्ये पुण्यातील केशवनगर परिसरात स्वतंत्र राहू लागले होते. मात्र, वेगळे राहू लागल्यानंतरही त्यांचा छळ सुरूच असल्याचा आरोप आहे. पतीने तृष्णा यांना मारहाण करून घराबाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर त्या माहेरी परतल्या होत्या. पुढे त्यांच्या पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे. पतीला दुसरे लग्न करता यावे यासाठी तृष्णा यांच्यावर वारंवार घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नणंदेच्या शैक्षणिक कर्जाशी संबंधित बाबींवरूनही त्यांना त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सर्व आरोपांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

तृष्णा यांचे वडील बालकृष्ण निकम (वय 74) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मुंढवा पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैला संजय सकपाळ आणि आजेसासू शकुंतला साळुंके यांचा समावेश आहे. तृष्णा यांच्या मृत्यूनंतर मिळालेल्या चिठ्ठीत पती आणि सासरच्या चार सदस्यांना जबाबदार धरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आर्थिक मागण्या, कथित मारहाण, मानसिक छळ आणि घटस्फोटासाठी दबाव टाकल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास सुरू आहे. तक्रारीत करण्यात आलेले आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.