नवी मुंबईत 9 वर्षांच्या चिमुरडीची हत्या; लैंगिक अत्याचारानंतर गळा आवळला

मुंबई तक

• 06:33 AM • 17 Oct 2026

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून बेपत्ता झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह पावणे एमआयडीसीतील जंगलात आढळला. या प्रकरणी हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Navi Mumbai Crime News

Navi Mumbai Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईत 9 वर्षांच्या चिमुरडीची हत्या

point

लैंगिक अत्याचारानंतर गळा आवळला

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून बेपत्ता झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह पावणे एमआयडीसी परिसरातील जंगलात आढळला. लैंगिक अत्याचारानंतर गळा आवळून तिची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपासात दावा आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

पीडित ही मुलगी तुर्भे येथील इंदिरानगर परिसरातील एका चाळीत आपल्या आई-वडिलांसह आणि तीन मोठ्या बहिणींसोबत राहत होती. ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होती. तिचे वडील गवंडी काम करतात, तर आई तुर्भे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करते. शनिवारी शाळेतून घरी आल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास जेवण करून ती खेळण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र, संध्याकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. सायंकाळी सातच्या सुमारास आई कामावरून घरी आल्यानंतर तिने मुलीबाबत विचारणा केली. त्यावेळी मोठ्या बहिणीने ती खेळण्यासाठी बाहेर गेल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात तिचा शोध सुरू केला.

हेही वाचा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, दिवाळीपूर्वी अतिरिक्त रक्क्म थेट खात्यात...

रात्र होऊनही मुलगी सापडत नसल्याने कुटुंबीयांनी तुर्भे एमआयडीसी परिसरासह आजूबाजूच्या भागात शोध घेतला. मात्र, तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर रविवारी मध्यरात्रीनंतर तुर्भे पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दृश्ये तपासली. त्यामध्ये एक संशयित मुलीला शेअरिंग रिक्षातून महापे रोडच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर दोघेही रस्त्यावरून पायी जात असल्याचेही सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसून आले. मुलीच्या आई-वडिलांनी या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली. त्यानंतर तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी सकाळी इंदिरानगर परिसरातून संशयिताला ताब्यात घेतले.

दरम्यान, मंगळवारी सकाळी पावणे एमआयडीसी परिसरातील बावखळेश्वर मंदिराजवळील जंगलात मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीच्या शरीरावर लैंगिक अत्याचार झाल्याचे संकेत मिळाले आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी याच परिसरात राहत असून तो रोजंदारीवर काम करत होता. चौकशीदरम्यान त्याने मुलीला खाण्यापिण्याच्या वस्तू देण्याचे आमिष दाखवल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह बावखळेश्वर मंदिराजवळील जंगलात टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील हत्येसंबंधीच्या तरतुदी आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत.