नवी मुंबई : बायकोच्या गुगल पेवर सतत पैसे यायचे, नवऱ्याला संशय आला अन्...

मुंबई तक

17 Oct 2026 (अपडेटेड: 17 Oct 2026, 10:34 AM)

नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. तिच्या बँक खात्यात गुगल पेवरुन सतत पैसे जमा व्हायचे. त्यावरुन झालेल्या वादातून ही घटना घडली.

Navi Mumbai Crime

Navi Mumbai Crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

संशयातून बायकोची हत्या

point

नवऱ्याला अटक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील कळंबोली येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्याचा संशय असल्यामुळे पतीनेच तिची निर्घृण हत्या केली आहे. पैशांच्या देण्या-घेण्यावरुन आणि इतर पुरुषांसोबतच्या संभाषणावरून झालेल्या वादानंतर आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचलं का?

काही काळापासून वाद

पोलीस सूत्रांनुसार, मृत महिलेची ओळख पिंकी मोनीश गोप ऊर्फ सोनिया मोहम्मद अबू खातून अशी पटली असून ती मूळची बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पती मोनीश गोप हा कलंबोली येथील सेक्टर-4ई मधील जेबी कॉम्प्लेक्समध्ये राहून डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. त्यांच्या संसारात गेल्या काही काळापासून वाद सुरू होते.

हे ही वाचा : तीन महिन्यापूर्वी IT जॉबसाठी पुण्यात शिफ्ट झालेल्या तरुणासोबत काय घडलं?

गुगल पे द्वारे यायचे पैसे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी हिच्या बँक खात्यात गुगल पे द्वारे इतर पुरुषांकडून दररोज पैसे येत असल्याचा आणि ती अनेकांशी बोलत असल्याचा संशय मोनीशला होता. यावरून 15 ऑक्टोबर रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने पिंकीच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर लाथाबुक्क्यांनी व मुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि तिला गंभीर दुखापत पोहोचवली.

हे ही वाचा : गोपीचंद पडळकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, उमेदवारी अर्ज ठरला वैध

हत्येचा गुन्हा दाखल

या अमानुष मारहाणीत पिंकी जागीच गंभीर जखमी होऊन मृत पावली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि कळंबोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कसून तपास सुरू केला आहे.