Beed Crime : रोहिदास हातागळे - बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील परळीच्या वेस भागात नवऱ्याच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून शितल बापुराव लोंढे (वय 30) या विवाहितेनं गळफास घेत जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना आहे. ही घटना 17 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : टायगर श्रॉफवर गोळीबार, 15 तासांत शुटर कोटा येथे कसे पोहोचले?
पत्नी शितलला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
शितलचा पती बापुराव लोंढे याला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन पीडितेला बेदम मारहाण करायचा, तसेच सतत शिवीगाळ देखील करत असे. या घटनेच्या रात्रीच त्याने शितलला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत नातेवाईकांनी वाद सोडवल्यानंतर स्वत:चे जीवन संपवलं.
गळफास घेत जीवन संपवलं
परिस्थिती पाहता घटनास्थळी असलेल्या लोकांनी पीडित शितलने राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवल्याची घटना आहे. पीडितेला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी पीडितेला मृत घोषित केले होते. या प्रकरणी शितलचे काका मनोहर जोगदंड यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात नवरा बापुराव लोंढे याच्यावर जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : Astrology : आजचे एकूण राशींचे भविष्य, 'या' राशींना पैसे जपून वापरण्याचा सल्ला
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत. दरम्यान, महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. पुरुषांप्रमाणेच आता महिलांनी देखील मानसिक त्रासातून आपलं जीवन संपवल्याच्या सतत घटना घडू लागले आहे.
ADVERTISEMENT












