टायगर श्रॉफवर गोळ्या झाडणारे तिघे 15 मिनिटात कसे सापडले?, पोलिसांनी दिल्ली धक्कादायक माहिती

मुंबई तक

• 02:23 PM • 19 Oct 2026

Tiger Shroff Case Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबईतून पळून जाणाऱ्या तीन आरोपींना राजस्थानमधील कोटा येथे पोलिसांनी अवघ्या 15 मिनिटांत ट्रेनची झडती घेऊन अटक केली. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय असून, मुंबई पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणातील महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

bollywood actor tiger shroff firing case three accused arrested kota train attempt escape nepal

Tiger Shroff Case

Google CTA

कोटा (राजस्थान): टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबईत गोळीबार केल्यानंतर ट्रेनमधून पळून जाणाऱ्या तीन आरोपींना राजस्थानमधील कोटा येथे पकडण्यात आले आहे. कोटाच्या एसपी तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मुंबई पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर डीएसपी आणि सायबर सेलच्या टीमने 15 मिनिटांत सापळा रचला, संपूर्ण ट्रेनची झडती घेतली आणि तिघांना पकडले. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याचा कट रचत होते.

हे वाचलं का?

आरोपींनी आखलेली नेपाळला पळून जाण्याची योजना

एसपींनी सांगितले की, रेहान (सोनीपत), हृतिक कुर्मी उर्फ रोशन (बिहार) आणि एक अल्पवयीन या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण अद्याप त्यांच्याकडून कोणतीही शस्त्रं जप्त करण्यात आलेली नाहीत. तथापि, त्यांनी त्या शस्त्रांचे काय केले, याबद्दल त्यांची चौकशी केली जाईल. गोळीबारानंतर त्यांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईतून थेट दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याची तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना राजस्थानमध्येच अटक केली.

हे ही वाचा>> टायगर श्रॉफवर गोळीबार, 15 तासांत शुटर कोटा येथे कसे पोहोचले?

कोटा एसपींनी पुढे सांगितले की, अनिल पंडितने संपर्क साधल्यामुळे रेहान हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात आहे. त्यानेच या संपूर्ण घटनेचे सूत्रधार होते. मुंबई पोलिसांनी आम्हाला त्यांच्याबद्दलची सर्व माहिती दिली आहे. आम्ही आता त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊ.

हे ही वाचा>> "डरपोक लोकं, कुठेतरी लपून बसतात..", टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले?

आरोपींना लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. प्रश्न हा आहे की, चौकशीदरम्यान हे आरोपी कोणते महत्त्वपूर्ण खुलासे करतील?