सिंधुदुर्ग : दामिनी पालव हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई तक

• 03:57 PM • 19 Oct 2026

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दामिनी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी साहिल धुरी याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Sindhudurg Crime News

Sindhudurg Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा संशय

point

दामिनी पालव हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा

point

आरोपीला पोलीस कोठडी

Sindhudurg Crime News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित दामिनी किरण पालव खून प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी साहिल विश्राम धुरी याला 24 ऑक्टोबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल (18 ऑक्टोबर) दुपारी आरोपीला कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. या गंभीर घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हे वाचलं का?

एकतर्फी प्रेमातून हत्या

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा खून एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या हत्येमागील नेमके मूळ कारण काय, घटनेपूर्वी नेमके काय घडले आणि या गुन्ह्यामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, या सर्व बाबींचा कसून शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा : राहुल गांधींच्या फोनमुळे भाजप प्रवेश थांबवला, पण आता थेट बोंद्रेंच्या संस्थांना नोटीस

नवे धागेदोरे उजेडात येणार

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. आरोपीची कसून चौकशी सुरू असून, त्याच्याकडून गुन्ह्याबाबत महत्त्वाची माहिती गोळा केली जात आहे. पोलीस तपासातून या प्रकरणाशी संबंधित आणखी काही नवीन आणि महत्त्वाचे धागेदोरे उजेडात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा : टायगर श्रॉफवर गोळ्या झाडणारे तिघे 15 मिनिटात कसे सापडले?, पोलिसांनी दिल्ली धक्कादायक माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष

आता या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण आणि या संपूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रम पोलीस तपासातून कधी पूर्णपणे स्पष्ट होतो, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.