Crime News : एका विधवा महिलेने आपल्याच 13 वर्षांच्या जुळ्या मुलांची प्रियकराच्या मदतीने मंगळवारी (20 ऑक्टोबर) सकाळी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलांचा महिलेच्या नवीन प्रेमसंबंधांना विरोध असल्याने हा खून करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलांची आई प्रीती, तिचा प्रियकर आणि 16 वर्षांच्या मोठ्या मुलाला ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. राजस्थानमधील डीग जिल्ह्यातील बडेसरा गावात ही घटना घडली.
ADVERTISEMENT
मावशीने आरडाओरडा केला अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 6 वाजता त्यांचे मृतदेह घराशेजारील एका रिकाम्या प्लॉटमध्ये आढळले. जुळे मुलगे घरी परत न आल्याने त्यांच्या मावशीने आरडाओरडा केल्यावर शोधमोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये दोन्ही मुलांचे गळे चिरलेले आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. मृत मुलांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केल्याचे निशाणही आढळले आहेत.
हे ही वाचा : बायकोला सोडून 35 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत राहू लागला, पण फ्लॅटमध्ये घडलं भयानक कांड
धक्कादायक सत्य समोर
तपासादरम्यान असे समोर आले की, प्रीतीचे 20 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील निरंजन सिंह यांच्याशी लग्न झाले होते. पतीच्या निधनानंतर प्रीती आपल्या चार मुलांसह म्हणजे एक 18 वर्षांची मुलगी, 16 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांची जुळी मुले यांच्यासह बडेसरा येथील माहेरी राहत होती. जुळी मुले प्रीती आणि तिच्या गावातीलच असलेल्या प्रियकराच्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत होते, तर 16 वर्षांच्या मोठ्या मुलाला या नातेसंबंधाबद्दल कोणतीही अडचण नव्हती.
हे ही वाचा : Personal Finance: सोनं न विकताही करता येईल कमाई, नेमकी कोणती आहे गुंतवणूक?
कसा रचला कट?
घटनेच्या दिवशी प्रीतीने आपल्या प्रियकराला घरी बोलावले आणि 16 वर्षांच्या मोठ्या मुलाला सोबत घेऊन या भीषण हत्येचा कट रचून अंमलबजावणी केली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव देऊन तपास सुरू केला असून, पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू केली आहे.
ADVERTISEMENT












